शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

रेशीम शेती करा अन् अनुदानही मिळवा; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७६१ एकरवर तुती लागवड 

By बापू सोळुंके | Updated: May 16, 2024 19:34 IST

महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी आवश्यक शेड आणि अन्य साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते.

छत्रपती संभाजीनगर : पारंपरिक शेतीमध्ये गुंतून न राहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी, यासाठी शासनातर्फे महारेशीम अभियानांतर्गत एकरी ४ लाख रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेत सहभागी होत जिल्ह्यातील ७५० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली आहे. जिल्ह्यात आज ७६१ एकरवर तुती लागवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा रेशीम कार्यालयाकडून मिळाली. 

भारतात रेशीम उत्पादन अत्यल्प असल्याने सुमारे ८ हजार टन रेशीम चीनमधून आयात केले जाते. जिल्ह्यातील पैठण आणि नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी विणकरांकडून दरमहा सुमारे ६०० ते ६५० किलो रेशीम सुताची मागणी असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशीम शेती वाढावी यासाठी रोजगार हमी योजनेत या शेतीचा समावेश केला आहे. महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी आवश्यक शेड आणि अन्य साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते. तसेच रेशीम शेती करताना शेतकरी कुटुंबाला रोहयोतून मजुरी दिली जाते. सुमारे तीन वर्षांत शेतकऱ्यांना ४ लाख रुपये शासनाकडून दिले जातात. यामुळे रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी बी.डी. डेंगळे पाटील यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, आज जिल्ह्यातील ७५० शेतकऱ्यांनी ७६१ एकरवर रेशीम लागवड केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांच्यासाठी रेशीम शेतीतून १२ महिने रोख उत्पन्न मिळू शकते. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर पुढील १५ वर्षे कोणतीही लागवड करण्याची गरज नाही. तुतीच्या झाडांची मशागत, खत आणि कोष निर्मितीपर्यंतचे चक्र व्यवस्थित सांभाळणे गरजेचे आहे. दर दोन महिन्यांतून एकदा एक उत्पादन घेता येते. तेही केवळ २० टक्के खर्चात असे त्यांनी नमूद केले.

रेशीम कोषाला प्रति किलो ४५० रुपये दररेशीम कोषचा दर हा सोन्यासारखा असतो. आपल्या देशात उत्पादन कमी असल्याने बाराही महिने रेशीमला चांगला भाव मिळतो. जालना येथे रेशीमची बाजारपेठ आहे. शिवाय कर्नाटक राज्यातही रेशीमची खरेदी, विक्री मोठ्या प्रमाणात होते. आज रेशीम कोषाला प्रति किलो ४५० रुपये दर आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद