शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'औरंगाबाद चित्रपट महोत्सव' देशात टॉप टेनमध्ये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 17:30 IST

देशात विविध महानगरात ३० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात येतात.

ठळक मुद्देमागील ७ वर्षांत रसिकांना २८० चित्रपट पाहण्यास मिळाले रसिकांनीच बनविला महोत्सव यशस्वी

औरंगाबाद : मागील ७ वर्षांपासून शहरात घेण्यात येणारा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने अल्पावधीत देशातील सर्वोत्कृष्ट पहिल्या १० महोत्सवात स्थान पटाकावले आहे. यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे. 

देशातील फिल्म सोसायटीची शिखर संस्था म्हणून फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया कार्यरत आहे.  देशात विविध महानगरात ३० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात येतात. फेडरेशनने त्या महोत्सवची यादी केली असून त्यांचे नियोजन, आयोजनानुसार क्रमवारी जाहीर केली. त्यात नववे स्थान औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवला दिले. या यादीत पाहिला क्रमांक गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आहे. त्यानंतर केरळ, कोलकाता, बेंगरूळ, मुंबई, चेन्नई, पुणे या बड्या शहरातील महोत्सवाचा नंबर लागतो.  त्यास तोडीस तोड आपल्या शहरात महोत्सव भरविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, सर्व बड्या शहरांतील चित्रपट महोत्सवला १५ ते २० वर्षे झाली आहेत; पण औरंगाबादने अवघ्या ७ वर्षांत एवढी लोकप्रियता मिळविली की, पहिल्या टॉप टेनमध्ये जागा पटकावली आहे. फी प्रेसीही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फी प्रेसीही जगभरातील महोत्सवामधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करते. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. यंदा पुरस्कार निवडीसाठी फी प्रेसीने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली होती. मागील ७ वर्षांत रसिकांना २८० चित्रपट पाहण्यास मिळाले आहेत.

रसिकांनीच बनविला महोत्सव यशस्वीजागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत. कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणीव अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने उद्योजक, महोत्सवाचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांच्या संकल्पनेतून व  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांच्या सहकार्याने महोत्सव घेण्यात येत आहे. राज्य सरकारचे पाठबळ मिळत आहे. औरंगाबादच्या रसिकांच्या प्रेमातून महोत्सवाने ९ क्रमांक मिळविला.        - नीलेश राऊत, संयोजक, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcinemaसिनेमाcultureसांस्कृतिक