शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये शिक्षण मंडळात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:59 IST

मंडळातील वित्त व लेखा विभागातील कुरघोडीच्या राजकारणामुळे हा निधी मंडळात पडून

ठळक मुद्दे१ लाख ७५ हजार धनादेश तयारवित्त विभाग कार्यवाही करेनावाटपाला मुहूर्त लागेना 

औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याची घोषणा झाली तेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले होते. घेतलेले शुल्क  विद्यार्थ्यांना परत करण्यासाठी शासनाने मंडळाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, मंडळातील वित्त व लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटप करण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयीचा शासनादेशही काढण्यात आला आहे. शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून केलेला आहे.  पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणे आवश्यक होते. यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने मंडळाला उपलब्ध करून दिला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ४१५ रुपये आणि बारावीच्या परीक्षेसाठी ४९० रुपये शुल्क मंडळाने घेतले होते. या शुल्काची परिपूर्ती करण्यासाठीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे तात्काळ वितरण होणे आवश्यक होते. मात्र, मंडळातील वित्त व लेखा विभागातील कुरघोडीच्या राजकारणामुळे हा निधी मंडळात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंडळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांना याविषयी विचारले असता, त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे वितरण करण्यासाठी १ लाख ७५ हजार धनादेश बँकेकडून मागविले आहेत. हे धनादेश विद्यार्थ्यांच्या नावे करण्याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याचे वितरण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, किती विद्यार्थ्यांना धनादेश देणार? किती रुपयांचे धनादेश आहेत? परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी शासनाने किती निधी उपलब्ध करून दिला? याविषयी त्यांना सांगता आले नाही. वित्त विभागाकडून ही माहिती घेण्यास सांगितले. मंडळाच्या वित्त विभागातील वित्त अधिकारी विलास नागदिवे हे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शाखाप्रमुख असलेले आर.आर. जोगदंड हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते, तर वरिष्ठ लिपिक एम.एस. खरात यांना विचारपूस केली असता, त्यांनी उद्धटपणे मला विचारायचे नाही. सचिव बसलेल्या आहेत, त्यांच्याकडूनच माहिती घ्या अन्यथा नागदिवे यांना विचारा, असे उत्तर दिले. मंडळाच्या वित्त विभागातील एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये मंडळात पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या १६ कोटी रुपयांचा प्रश्नविभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत इयत्ता दहावी आणि बारावीच्या तब्बल ३ लाख ५५ हजार २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क मंडळाकडे भरले आहे. या पाचही जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झालेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ देणे मंडळाला बंधनकारक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी ४१५ रुपये आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ४९० रुपये घेण्यात आले होते. त्यामुळे एकूण ३ लाख ५५ हजार २१४ विद्यार्थ्यांना १६ कोटी ४५ हजार ६१० रुपयांचा निधी वाटप करावा लागणार आहे. हा निधी केव्हा वाटप करणार? वाटप केलेले धनादेश विद्यार्थ्यांना मिळणार का? धनादेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे बँकांमध्ये खाते आहे का? खाते नसतील तर धनादेशाची मुदत संपेपर्यंत विद्यार्थी बँक खाते उघडणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकार