शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी दाबले; औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एक घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:30 IST

महापालिकेत सुमारे १२५ कं त्राटी संगणक आॅपरेटर्सचे मागील ८ ते १० वर्षांतील पीएफ आणि ईएसआयची रक्कम भरणा केली नसल्याचा आरोप गुरुवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला.

ठळक मुद्दे मागील ८ वर्षांपासून १२५ कर्मचारी संगणक आॅपरेटर म्हणून गॅलक्सी एजन्सीमार्फत कार्यरत आहे.आठ वर्षांपूर्वीचे व आजचे वेतन, त्यानुसार सरसकट गोळाबेरीज केली तर काही कोटींच्या आसपास ती रक्कम जाते.

औरंगाबाद : महापालिकेत सुमारे १२५ कं त्राटी संगणक आॅपरेटर्सचे मागील ८ ते १० वर्षांतील पीएफ आणि ईएसआयची रक्कम भरणा केली नसल्याचा आरोप गुरुवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला. कोट्यवधी रुपयांच्या आसपासची रक्कम गॅलक्सी नावाच्या संस्थेने न भरल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम हडपली की भरलीच नाही, याची माहिती प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांनी मागविली आहे. 

आठ वर्षांपूर्वीचे व आजचे वेतन, त्यानुसार सरसकट गोळाबेरीज केली तर काही कोटींच्या आसपास ती रक्कम जाते. मागील ८ वर्षांपासून १२५ कर्मचारी संगणक आॅपरेटर म्हणून गॅलक्सी एजन्सीमार्फत कार्यरत आहे. कोऱ्या व्हाऊचरवर त्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाते. साडेनऊ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या  खात्यावर सध्या आरटीजीएसने जमा होते. मात्र, पालिकेतून साडेसोळा हजार रुपयांची रक्कम प्रतिकर्मचारी घेतली जाते. संबंधित एजन्सी कुणाची आहे. मालक कोण आहे. कधीपासून हा सगळा गैरप्रकार सुरू आहे, याची माहिती प्रभारी कामगार अधिकारी तथा विधि अधिकारी अपर्णा थेटे यांना देता आली नाही. मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे त्यांनी आज पालिकेत धाव घेतल्यानंतर या सगळ्या घोटाळ्याचे बिंग फुटले. या सगळ्या गैरव्यवहारात कामगार अधिकाऱ्यांपासून लेखा विभागातील यंत्रणेसह आयटी विभागातील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. इक्बाल नावाची व्यक्ती सुपरवायझर म्हणून काम पाहत असल्याचे समोर आले आहे. 

महाराणा एजन्सी, बजरंग एजन्सी आणि गॅलक्सी या तीन संस्थांमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा पालिका घेत आहे. गॅलक्सीचा कर्ता धर्ता कोण याची माहिती कामगार अधिकारी थेटे यांनादेखील नाही. मग त्यांनी आजवर संस्थेने सादर केलेल्या बिलांना मंजुरी का व कशासाठी दिली, असा प्रश्न आहे. 

महापौरांचा संतापप्रिन्सिपल एजन्सी म्हणून गॅलक्सीसोबत मनपाचे नाव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर पीएफ, ईएसआय,भत्त्यांची रक्कम मनपाला द्यावी लागेल. दोन महिन्यांनी सदरील कंपनीसोबतचा करार संपणार आहे. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे  वेतन नाही. फेबु्रवारी व मार्चचे बिल थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने हा प्रकार समोर आल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी संताप व्यक्त केला. गॅलक्सीच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन निवेदन दिले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEmployeeकर्मचारीCorruptionभ्रष्टाचार