शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पीक नियोजन ढेपाळले, क्षेत्रही घटले

By admin | Updated: August 1, 2014 00:30 IST

भास्कर लांडे, हिंगोली हिंगोली : मान्सून वेळेवर येईल, चांगला बरसेल, हे गृहित धरून दरवर्षी शेतकऱ्यांचे पीक नियोजन असते. यंदाही तोच कित्ता गिरवला गेला.

भास्कर लांडे, हिंगोलीहिंगोली : मान्सून वेळेवर येईल, चांगला बरसेल, हे गृहित धरून दरवर्षी शेतकऱ्यांचे पीक नियोजन असते. यंदाही तोच कित्ता गिरवला गेला. मात्र मान्सूनचे ढग दाटून आले तरी थेंबही पडला नाही. त्यामुळे पेरण्या लांबल्या. काही ठिकाणी केलेल्या वाया गेल्या. दुबार, तिबार पेरणी करूनही आता पुन्हा आभाळाकडेच पाहण्याची वेळ आली आहे. यात पीक नियोजन तर ढेपाळलेच मात्र अनेक पिकांच्या पेरणीचा काळच निघून गेल्याने पेरणीचे क्षेत्रही घटले आहे. कृषी विभागाकडून ८0 टक्के पेरणीचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र त्यात पीक उगवले नाही, पेरणी वाया गेल्याने पुन्हा कमी-जास्त प्रमाण होत आहे. मागील दहा वर्षांपासून कधीही न घटलेल्या कापसाच्या क्षेत्रात गतवर्षी मोठी घट झाली. नियोजित १ लाख २७ हजारपैकी ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरच कापसाची लागवड झाली. ९४ हजार हेक्टर क्षेत्र गृहित धरले होते. कमी झालेले क्षेत्र सोयाबीनखाली जाणार असल्याने यंदा २ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज होता. मूग, उडीद, तूर आणि गळीत व कडधान्य पिकांचे क्षेत्रात घट होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. एकूण ३ लाख ४० हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे कृषी विभागाचे नियोजन होते; परंतु एका महिन्याच्या उशिराने १२ जुलै रोजी मान्सूनचे आगमन झाल्याने सर्वच अंदाज चुकला. आयत्यावेळी कृषी विभागाला नियोजनात बदल करावा लागला.नव्या नियोजनात कपाशी ९४ वरून ८४ हजार हेक्टरपर्यंत घसरली. तीळ, बाजरी, भात हद्दपार सोयाबीन २ लाखवरून १ लाख ३४ हजार हेक्टरांवर आले; पण शेतकऱ्यांनी सोयाबीनची जोमाने पेरणी केल्याने १ लाख ५१ हजार ८४४ हेक्टरवर पेरणी झाली. ६८ हजार हेक्टर क्षेत्रावरच उत्पादकांनी कापसाची लागवड केली. अपेक्षेनुसार उडीद २ हजार ७९४ तर मूग ३ हजार ९४ हेक्टरवरच पेरले गेल्याने भविष्यात डाळीचे दाम गगनाला भिडण्याची शक्यता आहे. तीळ, बाजरी, भुईमूग, काराळ, भात, सूर्यफुल जिल्ह्यातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. हे सर्व पिकांची २ हजार हेक्टरवरही पेरणी होणार नाही. दुसरीकडे ४४ हजार ८९० पैकी ११ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाल्याने कडब्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता वाटते. प्रामुख्याने सोयाबीन वगळता सर्वच गळीत धान्य आणि तूर वगळता कडधान्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय घट झाली. यंदा कापसाला दूर केले असताना पावसाने विलंब केल्याने सोयाबीनचाही पेरा कमी झाला. त्यातच उशिराच्या पेरणीमुळे उत्पादनात लक्षणिय घट होणार असल्याने जिल्ह्याची उत्पादकता घसरेल. परिणामी, उत्पादनात झालेली घट शेतकऱ्यांची वाट लावणारी आहे.औंढा नागनाथ तालुक्यात ६५ टक्के पेरण्या पूर्णगजानन वाखरकर ल्ल औंढा नागनाथउशिरा पाऊस सुरू झाल्याने औंढा तालुक्यात जुलै अखेर केवळ ६५ टक्के पेरण्याच पुर्ण झाल्या असून ४५ टक्के पेरण्या होणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भालचंद्र वाघ यांनी दिली आहे. औंढा नागनाथ तालुक्यामध्ये यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. जून, जुलै म्हणावा तसा पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. केवळ नशिबाच्या जोरावरच शेतकऱ्यांनी हिंमतीने पेरणी करीत आहेत. तालुक्यात १६३ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. एवढ्या कमी पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. तालुक्यात ज्वारी ७२०७, मक्का ११५०, तूर ४६५०, मूग ४६, उडीद १२०, तीळ ६०, हळद ७१०, कऱ्हाळ ८०, कापूस १२६४२, सोयाबीन १३५३८, हेक्टर एकूण ४४०३२६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली असून एकूण क्षेत्र ६१६२० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. असून शेतकरी पेरण्या करीत असल्याची माहिती भालचंद्र वाघ यांनी दिली आहे. कळमनुरी तालुक्यात ९० टक्के पेरण्याशेख इलियास ल्ल कळमनुरीयंदा सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला. उशिरा पेरण्या झाल्याने मूग, उडदाचे पेरणी क्षेत्र २५ टक्क्याने घटले. एकंदरीत तालुक्यात आतापर्यंत ९० टक्के पेरण्या झाल्या.तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७३ हजार ३२० हेक्टर आहे. त्यापैकी ९० टक्के पेरण्या झाल्या उर्वरित पेरण्या अजूनही सुरू आहेत. ज्वारी १०९३ हेक्टर मका, १६६ हेक्टर, तुर ८५ टक्के मुग, १२००, उडीद ८१४, हळद ११९७, केळी ३२, सोयाबीन २७ हजार ३२५ तर कापूस १७ हजार ४८६ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत.तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा फाटा या भागात पेरण्या झालेल्या आहेत. तर नांदापूर वाकोडी, पोत्रा, सिंदगी, खरवड आदी भागात अजुनही पेरण्या सुरूच झालेल्या आहेत. पाऊस तब्बल एक महिना उशिरा झाल्याने पेरण्यांना उशिरा झाला. पाऊस उशिरा झाल्याने मूग, उडीद, तुरीचे क्षेत्र कमी झाले आहेत. अजूनही नदी-नाले कोरडेच आहेत. खरीप ज्वारी, मूग, तूर व उडदाचे क्षेत्र घटलेचंद्रकांत देवणे ल्ल वसमतमृग नक्षत्रानंतर महिना- दीड महिना पावसाने दडी मारल्याने वसमत तालुक्यातील खरीप ज्वारी, मूग, उडीद व तूर पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने आजपर्यंत ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. वसमत तालुका सिंचनाखालील आहे. त्यामुळे मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसानंतर शेतकरी लगेच पेरणीला लागतात. आबक पेरणी मोठ्या प्रमाणात होत असते; परंतु यावर्षी मृग कोरडा गेला. तर १५ जुलैपर्यंतही पाऊस न झाल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. वसमत तालुक्यात ८२ हजार ८५० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी १० हजार ४६४ हेक्टर ऊस व १६३४ हेक्टरवर केळीची लागवड आहे. हे क्षेत्र खरिपाच्या क्षेत्रातून वजा केले असता ७४ हजार ३८० हेक्टर क्षेत्र खरिपाचे राहते. यापैकी ५५ हजार ५२३ हेक्टरवर आजपर्यंत पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी.पी. कदम यांनी दिली.ज्वारीचे क्षेत्र ९० टक्क्यांनी घटले1 १५ जुलैपर्यंत पेरणी होऊ न शकल्याने खरीप ज्वारीचे क्षेत्र सुमारे ९० टक्क्यांनी घटले आहे. तालुक्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ८८० हेक्टर असताना यावर्षी केवळ १ हजार ६१ हेक्टरवरच खरीप ज्वारीची लागवड झाली आहे. 2 मुगाचे क्षेत्र २ हजार ६६० हेक्टर असताना केवळ ४७० हेक्टरवर लागवड झाली आहे. तर तुरीचे क्षेत्र ७ हजार २१० हेक्टर असताना ३ हजार ६९९ हेक्टरवर तूर लागवड झाली आहे. 3 एकंदरीत पावसाळा लांबल्याने तालुक्यातील खरीप हंगामावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. संभाव्य चारा टंचाईची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी मका हे चारा पीक वाढवले असल्याचे चित्र असून, ३९१ हेक्टवर मका लागवड झाल्याची नोंद आहे. 4 याशिवाय सोयाबीन २१ हजार ६१८ हेक्टर तर कापूस १९ हजार ५७६ हेक्टरवर पेरण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात यावर्षी फक्त ३० टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी आजपर्यंत १०५ मि.मी. पाऊस झाल्याचे तालुका कृषी अधिकारी डी.पी. कदम यांनी सांगितले.खरीप हंगाम सापडला संकटातराजकुमार देशमुख ल्ल सेनगाववरूणराजाने वक्रदृष्टी दाखविल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सेनगाव तालुक्यात २५ हजार हेक्टरवर तर पेरणीच नाही. पेरणीची वेळ संपली असतानाही जोरदार पाऊस होईल, या आशेवर पेरण्या रखडल्या असून काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेही संकट निर्माण झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प असा ११६.६४ मि.मी. पाऊस आजपर्यंत तालुक्यात पडला आहे. मृग नक्षत्रात खरीप पेरण्या होतील, या आशेवर शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण करून बियाणे, खते खरेदी केली होती; परंतु जून-जुलै महिन्यात तालुक्यातील सर्वच भागात पेरणीयोग्य असा एकही मोठा पाऊस आजपर्यंत झाला नसल्याने गंभीर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी चालू आठवड्यात जोखीम पत्करत पेरणी सुरू केली आहे. पेरणीसाठी आवश्यक मोठा पाऊस पडला नसल्याने एकूण ९२ हजार हेक्टर लागवडी क्षेत्रावर ५५ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या पिकांची पेरणी केली आहे. अत्यल्प पावसावर पेरणी होत असल्याने बियाणांची उगवणक्षमता कमी झाली आहे. सुपीक जमिनीवर तर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जोखीम पत्करून पेरणी करणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. उशिरा व अत्यल्प पावसावर झालेल्या पेरण्यामुळे खरिपाच्या उत्पादनावर निश्चित परिणाम होणार आहे. आॅगस्ट आला असता तालुक्यातील प्रमुख कयाधू नदीसह नदी, नाले साठवण, तलाव कोरडे आहेत. पाणीपातळीत किंचितही वाढ झाली नसून विहिरी, बोअर कोरडेच आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सार्वधिक गंभीर बनला आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत जवळपास २५ हजार हेक्टर जमिनीवरील पेरण्या रखडल्या आहेत. एकंदर तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने एकूण स्थितीचा आढावा घेण्याची गरज आहे. केंद्रा बु. परिसर दुष्काळाच्या छायेतशेख महेमूद ल्ल केंद्रा बु.दोन महिन्यात केद्रा बु. परिसरातील जामठी बु., गोंधनखेडा, ताकतोडा, कहाकर बु., वरखेडा, बटवाडी, वलाना, मन्नास पिंपरी, हिवरा, माहेरखेडा, केंद्रा खुर्द या भागात एकही मोठा पाऊस झाला नव्हता. मात्र २१ व २३ जुलै रोजी रिमझिम पाऊस झाला. या रिमझिम पावसाच्या भरवशावर पसिरातील जवळपास ६ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली. दोन महिन्याच्या उशिराने खरीप पेरण्या झाल्यामुळे २४ जुलै पासून पेरणीला सुरूवात झाली. २७ जुलैला १०० टक्के पेरण्या झाल्या. परिसरात चोहीकडे उन्हाळा दिसत असून गुरांच्या चाऱ्यांचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. उशिरा पेरणीला सुरू झाल्यामुळे उडीद, मुग, ज्वारी, कापूस ही पिके पेरता आली नाहीत. तर परिसरात सोयाबीन पिकांची ९० टक्के पेरणी झाली असून उर्वरित १० टक्केच हळद व तूर पिकांची पेरणी झाली आहे. परिसरात कधी कडक उन्हाळा तर कधी पावसाचे ढग जोमाने येतात. मात्र पाऊस सुरू होण्याच्या आनंदात ढग हवेने निघून जातात. २७ जुलैला पेरण्या पुर्ण झाल्यामुळे उत्पादनावर मोठी घट होणार असल्याचे जाणकार कास्तकार सांगत आहेत. २०१४ मधील पावसाचे नक्षत्रनक्षत्र दिनांकवाहन मृग८ जून हत्तीआर्द्रा२२ जून मोरपुनर्वसू६ जुलै गाढवपुष्य२० जुलै मेंढाआश्लेषा३ आॅगस्ट उंदीरमघा १६ आॅगस्ट कोल्हापूर्वा ३० आॅगस्ट मोरउत्तरा १३ सप्टेंबर घोडाहस्त २७ सप्टेंबर बेडूकचित्रा १० आॅक्टोबर म्हैस स्वाती २४ आॅक्टोबर घोडापिके आधीचे क्षेत्र आताचे पेरणी टक्केवारीसोयाबीन २,००३५५ १३४४० १५१८४४ ११४.६०कापूस ९४००० ८४२७० ६८०७१ ८०.७८ज्वारी १६१०६ ४४८९० ११९०४ २६.५२तूर २७८९३ २७८९३१८४२८ ६५.९६मूग १८०७० १८०७० ३००० १७.१२उडीद १६४२० १६४२० २७९४ १७.०२