शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

'पीकविमा कंपनीने फसवले'; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची खंडपीठात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 12:44 IST

याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते.

ठळक मुद्दे७२ तासात ऑनलाईन तक्रार केली नसल्याची सबब पुढे करून कंपन्या पीकविम्याचे पैसे देण्यास नकार

औरंगाबाद : गेल्या वर्षी खरीप हंगामात पिकाचे नुकसान झालेल्या उस्मानाबादच्‍या १५ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांच्या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे.

याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. मात्र, ७२ तासात ऑनलाईन तक्रार केली नसल्याची सबब पुढे करून कंपन्या पीकविम्याचे पैसे देण्यास नकार देत आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी कंपन्यांना आदेश देऊ, अशी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, संबंधीत कंपन्यांकडून दखल घेतली गेली नाही. नवनाथ शिंदे, प्रवीण जाधव, किरण जाधव, सज्जन मते, समाधान मते, सचिन काळे, अश्रुबा बीक्कड, सूर्यकांत देशमुख, प्रफुल देशमुख, विकास जाधव, विश्र्वनाथ वाटवडे, योगेश जाधव, बापू जावळे, विश्र्वनाथ जाधवर आणि बाळू केसकर या १५ शेतकऱ्यांनी ॲड. संजय वाकुरे यांच्‍या मार्फत याचिका सादर केली आहे.

कंपनीने फसवे कारण दिल्याचा आरोपउस्मानाबादेत बाधित शेतकऱ्यांची संख्या ४ लाख १६ हजार ६०० इतकी आहे, तर बाधित क्षेत्र २ लाख ६२ हजार ७८५ हेक्टर आहे. यामध्ये जिरायती २ लाख ३० हजार, बागायती २९ हजार ३१३ व फळपिकाचे क्षेत्र ३ हजार १९३ हेक्टर इतके आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार बाधित क्षेत्र २५ टक्क्यांपर्यंत असल्यास कृषी, महसूल विभाग अथवा कंपनी यांच्यापैकी कोणत्याही एका यंत्रणेला पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र, नुकसान २५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास वैयक्तीक तक्रारी करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचा विचार केल्यास ते जवळपास ५२ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे कंपनीने दिलेले कारण हे फसवे आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद