शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांपुढे मागणीचे संकट; ३०-४० टक्केच उत्पादन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:25 IST

प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे. 

ठळक मुद्देबाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाहीमागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू

- विजय सरवदे

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या उत्पादनांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, मोठ्या उद्योगांकडून पुरेशा प्रमाणात मागणी नसल्यामुळे लघु उद्योग धीम्या गतीने सुरू आहेत. प्रामुख्याने चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत ३० ते ४० टक्के उत्पादन सुरू आहे. 

लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून संपूर्ण उद्योग ठप्प झाले होते. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रेड झोन वगळून उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चितेगाव, पैठण औद्योगिक परिसरातील उद्योग सुरू झाले. त्यानंतर अलीकडे चौथ्या टप्प्यात शहरातील चिकलठाणा व रेल्वेस्टेशन या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना परवानगी मिळाली. चिकलठाणा व रेल्वेस्टेशन परिसरात जवळपास साडेचारशे ते पाचशे उद्योग असले तरी आतापर्यंत सव्वादोनशे उद्योग सुरू झालेले आहेत. या परिसरातील उद्योग प्रामुख्याने आॅटोमोबाईल उद्योगांवर अवलंबून आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे दुचाकी, तीनचाकी विक्रीचे शोरूम बंद असल्यामुळे या वाहननिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे आॅटोमोबाईल कंपन्यांकडून अवलंबित उद्योगांना पुरेशा प्रमाणात मागणी (आॅर्डर) नाही. परिणामी, सध्या मागच्या राहिलेल्या व निर्यातीसंबंधीच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतीतीत दीड शिफ्टमध्ये सुमारे तीन ते चार हजार कामगार काम करीत आहेत. औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी कोरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे जवळपास ५० ते ६० उद्योग बऱ्यापैकी सुरू आहेत. 

बाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाहीबाजारपेठ उघडल्याशिवाय उद्योगांना गती येणार नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन उघडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रामुख्याने वाहन विक्रीचे शोरूम सुरू झाल्यास आॅटोमोबाईल कंपन्या पूर्ण ताकदीने सुरू होतील व या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळतील. आॅटोमोबाईल डीलर्सचे व्यवहार जोपर्यंत सुरू होत नाहीत, तोपर्यंत औरंगाबादची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नाही. सध्या लघु उद्योगांपुढे आॅर्डरची अडचण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना बस, काही जण कारमधून ने-आण करतात. सोमवारपर्यंत कामगारांना दुचाकीवरून येण्यास परवानगी मिळेल. - मनीष अग्रवाल, सचिव, मासिआ 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी