शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत कंपनीमालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:48 IST

काम संपल्यानंतर कंपनीच्या छतावरून जात असताना खराब झालेल्या सिमेंटचा पत्रा तुटून जवळपास २५ ते ३० फूट उंचावरून कामगार खाली पडला

ठळक मुद्देदीड महिन्यापूर्वी कंपनीत पत्रे बदलताना खाली पडून कामगाराचा मृत्यू

वाळूज महानगर : दीड महिन्यापूर्वी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत सिमेंटचे पत्रे बदलताना खाली पडून मरण पावलेल्या कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनी मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर शिवकुमार पासवान (रा. जोगेश्वरी) हा १७ मे रोजी सकाळी त्याचे मित्र तरबेज, अलीम, खिल्लारे यांच्यासोबत वाळूज एमआयडीसीतील बालाजी पॅकेजिंक या कंपनीत सिमेंटचे खराब झालेले पत्रे काढण्यासाठी गेला होता. दरम्यान, सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम संपल्यानंतर ठेकेदार युनुस शेख याने सागर व त्याच्यासोबत असलेल्या इतर कामगारांना तुम्ही काम करीत असलेल्या बाजूच्या पत्र्यातून पाण्याची गळती होत असून, ते काम करून घरी जा, असे सांगितले. सायंकाळ झाल्याने कामगारांनी उद्या काम करतो, असे ठेकेदार युनुस शेख याला सांगितले. मात्र, ठेकेदाराने या चौघांना बळजबरीने काम करण्यास भाग पाडले.

काम संपल्यानंतर कंपनीच्या छतावरून जात असताना खराब झालेल्या सिमेंटचा पत्रा तुटून सागर हा जवळपास २५ ते ३० फूट उंचावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. सागरला इतर कामगारांनी बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. कंपनीत काम करण्यापूर्वी कंपनी मालक चांडक व ठेकेदार शेख युनुस यांनी कामगारांना सुरक्षा साधने व सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न केल्याने सागर पासवान याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पासवान याची आई गीता पासवान यांच्या तक्रारीवरून कंपनी मालक चांडक व ठेकेदार शेख या दोघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद