शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणा-या ‘खिडकी गँग’च्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 18:19 IST

शहरातील केवळ बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चो-या करणा-या ‘खिडकी गँग’ला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री पकडण्यात यश आले. वाळुज रोडवर आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. या चोरट्यांनी शहरात सात ते आठ बंगल्यात घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

औरंगाबाद: शहरातील केवळ बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून चो-या करणा-या ‘खिडकी गँग’ला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री पकडण्यात यश आले. वाळुज रोडवर आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. या चोरट्यांनी शहरात सात ते आठ बंगल्यात घरफोड्या केल्याची कबुली दिली. सय्यद सिकंदर सय्यद अख्तर (३५,रा. महंमदिया कॉलनी,बीड), सय्यद सिराज सय्यद लियाकत(३२,रा.पुरग्रस्त कॉलनी,बीड, ह.मु.वडगाव गुप्ता, अहमदनगर) आणि शेख बबलू शेख रहेमान(३१,रा.नागापूर एमआयडीसी, दांगटमळा, अहमदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, शहरातील सिडको एन-३,एन-४, व्यंकटेशननगर, सिडको एन-१ आदी वसाहतीमधील बंगल्यांच्या खिडक्या तोडून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचा चोरून नेण्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हेशाखेचे पोलीस तपास करीत असताना घरफोड्या करणारी टोळी कारने वाळुज रोडने शहरात येत असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात  यांच्या मार्गदर्शनाखाली  यावेळी गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकाँ शिवाजी झिने, विलास वाघ, राजेंद्र साळुंके, रवी दाभाडे,विशाल सोनवणे, देवचंद महेर, गजानन मांटे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत, चालक थोरे यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाळुज रोडवर सापळा रचला. यावेळी संशयित कार दिसताच पोलिसांनी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. मात्र कारचालक न थांबता पुढे निघाला.यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी तब्बल आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून कारसमोर पोलिसांची जीप आडवी लावून त्यांना पकडले. पोलिसांनी फिल्मस्टाईल त्यांच्यावर धावा बोलताच आरोपींना प्रतिकार करता आला नाही. यावेळी त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याजवळ स्क्रु-ड्रायवर, लहान टॉमी, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज मिळाला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हे शाखेत आणले. तेथे त्यांची कसून चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचे समोर आले.