शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये गुन्हेगारीत झाली घट; आयुक्तांनी आकडेवारी केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 11:45 IST

शहर जसे वाढत होते तसे शहरात गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी पोलीस आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे. यानुसार शहरात गुन्हेगारीत मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षीशीच्या तुलनेत गुन्हागरी कमीआधुनिक उपाययोजनांमुळे नियंत्रण शक्य झाल्याचा दावा

औरंगाबाद : शहर जसे वाढत होते तसे शहरात गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी पोलीस आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे. यानुसार शहरात गुन्हेगारीत मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या उपायोजनांचा फायदा होऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीचा आलेख खालावल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर म्हटले आहे.

गतवर्षी दरोड्याच्या १८ घटना घडल्या होत्या. यंदा ७ गुन्हे दाखल आणि ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ४३ टक्के गुन्हे घटले आहेत. जबरी चोरीच्या २९५ घटना असून, यंदा १४१ प्रकार समोर आले असून, ११५ उघडकीस आले आहेत. १५४ ने गुन्हे घटले आहेत. सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावल्याने संवेदनशील भागात अधिक परिणामकारक ठरले आहे. घरफोडीच्या ३२७ घटनांची नोंद होती. यंदा १५२ प्रकार घडले आहेत. १७५ ने घरफोडीचे प्रकार घटले आहे.

सर्व घटनांचा विचार केला असता ८५३ गुन्ह्यांची घट झाली असून, गतवर्षी ते २,३५६ नोंद होती. यंदा १,४९३ पर्यंत नियंत्रण आणले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पोलीस अधिका-यांचीदेखील मोठी मदत होत आहे. खुनाच्या गुन्ह्यातदेखील ४५ टक्के घट असून, दुखापतीच्या प्रकारात ११ टक्के घट झाली आहे. सरकारी नोकरावर हल्ल्याचे प्रकार २६ टक्क्यांनी घटले असून, महिलावरील अत्याचारांत ७, तर बलात्काराच्या घटनांत १३ टक्के घट झाली आहे. मंगळसूत्र चोरी ५२ टक्क्यांनी कमी झाली आहे. सीसीटीव्ही व पोलिसांच्या गस्तीचा फायदा झाला आहे. अजूनही या गुन्ह्यात अधिक लक्ष घालण्यासाठी उपायोजना आखल्या जाणार आहेत, असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी कळविले.