ढोकी : पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द विशेष पोलीस पथकाने कारवाई करून २३ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई रविवारी दुपारी तेर येथे करण्यात आली असून, या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेर येथे पैशावर तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती़ या माहितीवरून विशेष पोलीस पथकाने पोलीस उपाधीक्षक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथे धाड टाकली़ या धाडीत १६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा जवळपास २३ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी पोहेकॉ संदीप चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ जणाविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहेकॉ एस़एसक़ट्टे हे करीत आहेत़
जुगार खेळणाऱ्या सोळा जणांवर गुन्हा
By admin | Updated: March 28, 2016 00:12 IST