भोकरदन: तालुक्यात महसूल विभागाने दोन दिवसांपासून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.शुक्रवारी उपविभागीय अधिकारी डॉ. एऩआऱ शेळके व तहसीलदार रूपा चित्रक यांनी बाणेगाव, केदारखेडा व गव्हाण संगमेश्वर या ठिकाणी तीन वाहने हे वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या तीन वाहनांविरूध्द राजूर पोलिस चौकीत गुन्हा दाखल आहे.तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा विधानसभेतही गाजला. केदारखेडा, मेरखेडा, वालसा खालसा या ठिकाणी छापे मारून ४०० ब्रास वाळूचा साठा करण्यात आला. दोन जे़सी़बी़पकडले त्यापैकी एका जे़सी़बी़ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी मंडळ अधिकारी के़डी़सोनोवणे, तलाठी अविनाश देवकर, अभय देशपांडे, योगेश नागरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यानी केदारखेडा, बाणेगाव, गव्हाण संगमेश्वर या ठिकाणी जाऊन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता बाणेगाव पाटीवर एम एच ०९ - बी़सी ४३५१, चालक विठ्ठल चुकटे, एम एच - ४ टी पी ९०९८ चालक मोतीराम तेटवार, तसेच एम एच १५ - बी़जे ४४६७ या गाड्यांची तपासणी केली. दोन्ही ट्रक चालकांजवळील आढळलेल्या पावत्यांमध्ये खाडाखोड होती. एका ट्रकने महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. मंडळ अधिकारी सोनोवणे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. भोकरदन तालुक्यातून सिल्लोड, बुलडाण्यासह इतर ठिकाणी वाळूचा पुरवठा करण्यात येतो. वाळू वाहतुकीसाठी विनाक्रमांकाच्या वाहनांचा वापर करण्यात येतो. या प्रकाराडे पोलिस तसेच महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. तहसीलदार रूपा चित्रक यांनी सांगितले की, वाळूच्या गाड्यांची तपासणी करण्यासाठी गेल्यावर बहुतांश गाड्यांना नबंर नसतो. शिवाय काही गाड्यांवर ज्या-त्या पक्षांची चिन्हे लावलेली असतात. कारवाई करण्यासाठी गेलो असता गाडीचा क्रमांक दिसत नाही व गाडी पळून गेली तर नेमकी कारवाई कोणावर करावी, हे कळत नाही. तहसील कार्यालयाच्या वतीने आऱटी़ओ़ना यासंबंधी पत्र देणार असल्याचे चित्रक यांनी सांगितले.महसूल विभागाच्या वतीने १४ जून रोजी एका जे़सी़बी़वर कारवाई केली. ते जे़सी़बी़ शेतकऱ्यांची पाईप लाईन खोदण्याचे काम करीत असताना उपविभागीय अधिकारी डॉ. शेळके यांनी पकडले. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख माधवराव हिवाळे यांनी सांगितले़ दरम्यान, महसूल व पोलिसांच्या कारवाईमुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)पोलिसांची ३० वाहनांवर कारवाईतालुक्यात खाजगी वाहने, अॅपेमधून वाळूची वाहतूक होती. तीन दिवसांत ३० वाहनांवर करवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी दिली.हिवाळे म्हणाले की पूर्णा ,गिरजेच्या पात्रातून सर्रास पणे वाळूचा उपसा होतो. कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खरी माहिती देण्याची गरज आहे. जर संबंधीत जे़सी़बी़ खरोखरच वाळू भरताना पकडले असेल तर आमचे काही म्हणने नाही मात्र प्रकार तसा नसताना सुद्धा कारवाई करण्यात आली. महसूल व पोलिसांनी शेतकऱ्यांचाही विचार करावा.
वाळूतस्करांविरूद्ध गुन्हे
By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST