शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

महाराजांवरील हल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा; परस्परविरुद्ध नोंदवल्या पोलिसांत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 14:10 IST

Crime against 30 persons in the case of attack on Maharaj : शुक्रवारी मोक्षदा एकादशीनिमित्त मेहरबान नाईक तांडा (ता. पैठण) भागातील श्रीराम टेकडीवर गणेश महाराज आणि निलजगाव येथील गावकऱ्यांत बाचाबाची झाली.

ठळक मुद्देगणेश महाराजांनी वादा दरम्यान दोन्ही हातात तलवार घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा गणेश महाराजांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी १४ जणांना अटक केली.

पैठण : तालुक्यातील गणेश महाराजांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी १४ जणांना अटक केली. यात महाराज आणि निलजगावातील गावकऱ्यांनी रविवारी बिडकीन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. यावरून निलजगावच्या अज्ञात २५ जणांसह गणेश महाराजांविरोधात बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश महाराजांवर औरंगाबादेत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शुक्रवारी मोक्षदा एकादशीनिमित्त मेहरबान नाईक तांडा (ता. पैठण) भागातील श्रीराम टेकडीवर गणेश महाराज आणि निलजगाव येथील गावकऱ्यांत बाचाबाची झाली. यादरम्यान गणेश महाराज गावकऱ्यांवर तलवार घेऊन धावून आल्याने त्यांनी महाराजांवर तुफान दगडफेक करत त्यांना गंभीर जखमी केले होते. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान पोलिसांनी गणेश महाराजांचा जबाब घेऊन निलजगावच्या अज्ञात ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर गणेश महाराजांनी वादा दरम्यान दोन्ही हातात तलवार घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी निलजगाव येथील वारकरी भरत तात्याराव मोगल यांनी गणेश महाराजांविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गणेश महाराजांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी त्यांची गाय परिसरातील मका पिकात गेली असता मी गायीला मूर्ख, असे संबोधले; परंतु तेथे हजर असलेल्या वारकऱ्यांनी ते स्वतःवर घेत २५ ते ३० जणांनी मला मूर्ख कुणाला म्हणता, असे विचारत दगड, काठ्या व कुऱ्हाडीने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. मला टेकडीवरून ढकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, गणेश महाराजांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांचे हातापाय फॅक्चर झाले आहेत. सध्या त्यांच्यावर औरंगाबादेत उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद