शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांकडून महसूल पथकावर हल्ल्याप्रकरणी १२० जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:24 IST

सहा जणांना अटक : फरार आरोपींच्या शोधात पोलीस रवाना

देवगाव रंगारी : वाळूमाफियांनी रविवारी शिवना नदीपात्रात महसूलच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिसांनी सोमवारी १२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.वैजापूर येथील तहसीलचे पथक लाखणी-मांडकी येथे अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी रविवारी गेले असता शिवना नदीपात्रात वाळू तस्करांसह जमावाने दगडाने हल्ला केला होता. या हल्ल्यात नायब तहसीलदारांसह तीन महसूल कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. सायंकाळी ६ वाजता पथक नदीपात्रात गेल्यावर एका टेम्पो व ट्रॅक्टरमध्ये १५ ते २० लोक वाळू भरताना दिसले. पथकाला पाहून हे लोक पळून गेले. टेम्पोचालक प्रभाकर मुळे व ट्रॅक्टर चालकाला पथकाने आपली वाहने वैजापूर तहसीलला नेण्यास सांगितल्यानंतर वाद झाला. चालकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावून सांगत असताना रामा मुळे, विठ्ठल उबाळे, शिवनाथ मुळे, गणेश वाहूळ, किशोर आवारे, सचिन निपाणे, नानासाहेब मुळे यांच्यासह देवळी येथील १२० महिला व पुरुष हातात लाठ्याकाठ्या व फावडे घेऊन धावून आले. पथकाला घेराव घालून मारहाण करण्यास सुरुवात केल्याने पथकातील नायब तहसीलदार भालेराव, संतोष जाधव, सचिन गायकवाड, विलास तोडगे, श्रीकांत म्हस्के हे गंभीर जखमी झाले.तलाठी श्रीकांत म्हस्के यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आरोपी गंगाधर कारभारी मुळे, शिवनाथ अंबादास मुळे, सचिन गुलाबराव निपाणे, नानासाहेब बाबुराव मुळे, विठ्ठल दिगंबर आवारे, गणेश प्रकाश वाहूळ यांना रात्री अटक करण्यात आली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास स.पो.नि. स्वप्ना शहापूरकर करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी