शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांवर उतारा खिळ्यांच्या कव्हरचा! प्राण्यांना होईल इजा, प्राणिप्रेमींमधून संताप

By संतोष हिरेमठ | Updated: June 14, 2024 10:31 IST

Chhatrapati Sambhajinagar: मोकाट श्वानांना चारचाकीपासून दूर ठेवण्यासाठी चक्क खिळे असलेले कव्हर वापरले जात आहे. या कव्हरची ऑनलाइन विक्री जोरात सुरू असून प्राणिप्रेमींमधून मात्र संताप व्यक्त होत आहे. 

- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर - मोकाट श्वानांना चारचाकीपासून दूर ठेवण्यासाठी चक्क खिळे असलेले कव्हर वापरले जात आहे. या कव्हरची ऑनलाइन विक्री जोरात सुरू असून प्राणिप्रेमींमधून मात्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर रात्री चारचाकी उभ्या असतात. त्यांच्या टपावर श्वान जाऊन बसतात. यातून स्क्रॅचेसही पडतात. कधी-कधी  छत दबते, तसेच काचा फुटण्याचा धोकाही असतो. यावर उपाय म्हणून खिळेयुक्त कव्हर बाजारात आले आहे. चारचाकीच्या छतावर आणि समोरील बाजूवर हे कव्हर टाकता येते. 

चारचाकीपेक्षा एखाद्याचा जीव महत्त्वाचा आहे, हे समजून घेतले पाहिजे. चारचाकीवर स्क्रॅचेस पडतात, म्हणून अशा टोकदार खिळे असणाऱ्या कव्हरला  प्रमोट करता कामा नये. चारचाकीवर साधे कव्हरही वापरता येतील.   - अमृता दौलताबादकर,सचिव, पीपल फाॅर ॲनिमल

चारचाकीसाठी टोकदार खिळे असलेले कव्हर वापरणे चुकीचे आहे. श्वानांना त्यापासून इजा होऊ शकते. अशा कव्हरवर बंदी आली पाहिजे.- प्रवीण ओहळ, सचिव, होप अँड ॲनिमल ट्रस्ट 

वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी हा उपाय नाहीवाहनाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मात्र, अशा प्रकारचे कव्हर वापरणे, हा त्यावर पर्याय नसल्याचे प्राणिप्रेमी संघटनांनी म्हटले.  टोकदार खिळे कव्हर टाकल्यानंतर मोकाट श्वान अशा चारचाकीपासून दूर राहतात; परंतु, अशा कव्हर असलेल्या चारचाकीवर पहिल्यांदा जाणारे श्वान जखमी होण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcarकारdogकुत्रा