शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे यांनी दमानियांविरुद्ध दाखल केलेला ‘तो’ गुन्हा रद्द करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 19:24 IST

फसविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक कट रचून, खोटे दस्त खरे असल्याचे भासवून त्याचा उपयोग केला, अशा आशयाची तक्रार खडसे यांनी दिली होती.

औरंगाबाद : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह इतर पाच जणांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा क्रमांक ११६/१८ रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी सोमवारी (दि.१९) दिला. 

अंजली दमानिया,रोशनी राऊत,गजानन मालपुरे, सुशांत कुºहाडे, सदाशिव सुब्रह्मण्यम आणि चार्मिन फर्मस् यांनी संगनमताने खोटा मजकूर आणि बनावट दस्त तयार करून लोकसेवकाने तो तयार केल्याचे भासवून मला (खडसे) फसविण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक कट रचून, खोटे दस्त खरे असल्याचे भासवून त्याचा उपयोग केला, अशा आशयाची तक्रार खडसे यांनी दिली होती. त्यावरून वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दमानिया व इतर यांनी खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.

याचिकेत त्यांनी ९ करोड ५० लाख रुपयांचा आणि १० लाखांचा दुसरा डीडी दाखल केला होता, असे खडसे यांना खंडपीठाची नोटीस मिळाल्यानंतर समजले होते. या संदर्भात चौकशी केली असता ते डीडी वटले नसल्याचे समजले होते. आरोपींनी सदर डीडीची मूळ प्रत पुन्हा चोरून त्याचा वापर उच्च न्यायालयात दाखल याचिकेत केला. आरोपींना ते दोन्ही डीडी कसे व कोणत्या मार्गाने मिळाले,त्याचा तपास करणे गरजेचे आहे, अशी तक्रार खडसे यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी दमानिया यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.

दमानिया यांनी स्वत: त्यांची बाजू मांडली. इतरांतर्फे अ‍ॅड. विजय बी. पाटील यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, खडसे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका अद्याप प्रलंबित आहे. त्या याचिकेतही  खडसे यांनी अर्ज दाखल करून, या डीडीसंदर्भात पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून, आपला याच्याशी काही संबंध नसल्याचा अहवाल दिलेला असल्याने ही जनहित याचिका रद्द करण्याची विनंती केलेली आहे. या दोन्ही डीडीसह हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यासंदर्भात एफआयआर दाखल करणे चुकीचे आहे. सुनावणीअंती खंडपीठाने एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाCrime Newsगुन्हेगारीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ