शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भू-माफियांचे धाडस वाढले; बनावट नकाशा, शिक्के वापरून जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 18:30 IST

सातारा पोलीस ठाण्यात समीर भंडारी, संभाजी अतकरे, विजयकुमार पाटणींसह पाचजणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : सातारा परिसरातील गट नंबर २२० मधील जमिनीचा बनावट नकाशा तयार करून तो सिडको कार्यालयास सादर करीत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक संभाजी अतकरे, समीर भंडारी, विजयकुमार पाटणी, जितेंद्र ढाकरे आणि अजय पवार यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

भाग्यदीप औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष भगवान बाबासाहेब गोर्डे (रा. एन ११, नवजीवन कॉलनी, हडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या संस्थेची सातारा परिसरातील गट नं. २२५ मध्ये दीड एकर आणि गट नं. २१९ मध्ये पावणेदोन एकर जमीन आहे. या जमिनीच्या उत्तर व पश्चिमेस गट नं. २्२० मध्ये श्री गुरुदेव बिल्डर्स ॲड डेव्हलपर्स संस्थेची जमीन आहे. या संस्थेत विजयकुमार पाटणी यांच्यासह इतर भागीदार आहेत. या गट नं.मध्ये २९ हजार ७०० चौरस मीटर जमीन रहिवासी वापराकरिता सिडकोकडून रेखांकन मंजूर केलेले आहे. २०१७ मध्ये श्री गुरुदेव संस्थेच्या भागीदारांनी गोर्डे यांच्या संस्थेच्या मालकीच्या जागेत तार कंपाऊंड बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना संस्थेतील सदस्यांनी तार कंपाऊंड करण्यापासून रोखले होते.

श्री गुरुदेव संस्थेच्या सदस्यांनी आमच्याकडे सिडको कार्यालयाने रेखांकन मंजूर केलेले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर एन.ए. असल्याचे सांगितले. यानंतर गाेर्डे यांनी सिडको कार्यालयाकडून रीतसर कार्यवाही करून रेखांकन केलेली कागदपत्रे मागितली. त्यामध्ये बनावट नकाशा तयार करून सादर केल्याचे निदर्शनास आले. यानंतर नगररचना विभाग, भूमी अभिलेख कार्यालयाने जमिनीची रीतसर मोजणी केली. त्यामध्ये श्री गुरुदेव बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स संस्थेच्या सदस्यांनी संगनमत करून बनावट शिक्क्यांच्या आधारे नकाशा तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याकरिता भाग्यदीप औद्योगिक सहकारी संस्थेने न्यायालयात प्रकरण नेले. न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार विजयकुमार पाटणी, संभाजी अतकरे, समीर भंडारी, जितेंद्र ढाकरे आणि अजय पवार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद