शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय देवगिरी किल्ल्यावर, किती तोफा माहितेय?

By संतोष हिरेमठ | Updated: August 19, 2024 19:45 IST

प्रवेशद्वारापासून शेवटच्या टोकापर्यंत तोफाच तोफा

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कधी ना कधी देवगिरी किल्ल्यावर गेले असतालच; पण या किल्ल्यावर किती तोफा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय याच ठिकाणी असून, अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून तर उंच अशा शेवटच्या टोकांपर्यंत तुम्हाला तोफाच तोफा पाहायला मिळतील.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणतर्फे ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यावर तोफांचे भव्य असे संग्रहालय साकारण्यात आले आहे. चांद मीनारसमोरील जागेत हे संग्रहालय आहे. देशातील अशाप्रकारचे पहिले खुले तोफ संग्रहालय असल्याचे सांगितले जाते.

किल्ल्यावर किती तोफा?देवगिरी किल्ल्यावर एकूण २६९ ताेफा आहेत. काही तोफा प्रवेशद्वाराजवळ (महाकोट) आहेत. चांद मीनारसमोर खुल्या संग्रहालयात ५३ तोफा आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी बुरुजावर तोफा आहेत. काही तोफा किल्ल्याच्या आतमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या सर्वांत वरच्या भागात काळा पहाड तोफ आहे.

किती दूरपर्यंत मारा, कोणत्या धातूचा वापर?साडेतीन कि.मी. अंतरापासून तर ९ कि.मी. अंतरापर्यंत मारा करणाऱ्या तोफ देवगिरी किल्ल्यावर आहेत. लोखंडी ओतीव तोफा, पंचधातूच्या ओतीव तोफा, मिश्र पद्धतीने बनविलेल्या बांगडी तोफा दिसून येतात.

या तोफेचे वजन तब्बल १४ टनदेवगिरी किल्ल्यावर सर्वाधिक म्हणजे १४ टन वजनाची एक तोफ आहे. ही तोफ म्हणजे मेंढा तोफ. या तोफेची ९ कि.मी. अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही तोफ पंचधातूपासून बनविण्यात आल्याचे गाइड सांगतात.

पर्यटकांमध्ये उत्सुकताकिल्ल्यावर एकूण २६९ तोफा आहेत. या तोफांविषयी पर्यटकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. तोफ कशी बनविली, किल्ल्यावर कशी आणली, किती वजन आहे, असे अनेक प्रश्न पर्यटक विचारतात.- सिराज शेख, गाइड, देवगिरी किल्ला

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण