शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर;दिवाळीनंतर सर्वत्र अराजकता दिसेल: प्रकाश आंबेडकर

By साहेबराव हिवराळे | Updated: September 29, 2023 16:03 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती सध्या २४ इंचाची झाली असून लोकसभा निवडणुकांपर्यंत ती २० इंचाची होईल

छत्रपती संभाजीनगर: सरकारच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव आहे. देश मणिपूर, गोध्रा होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तसेच कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी  मतदान होईपर्यंत शांत रहा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना यावेळी केले. ते शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

पुढे ते म्हणाले, आरक्षणावर रान उठवून जनतेची डोके भडकविणाऱ्या सरकारने वेगळे राजकारण सुरू केले आहे. हिंदुच्या सरकारमध्ये हिंदूवरच हल्ला चढविला जाणार असल्याने मुस्लीमच नव्हे तर शिख, जैन देखील यात भरडले जाण्याची भिती त्यांनी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवल्या जातो. मग आता भाजप तर लुटारूची गँगच आहे, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली. यावेळी पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष  प्रभाकर बकले, योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, रूपचंद गाडेकर आदींची उपस्थिती होती.

५६ इंच छाती २० इंच होईल एक कंगाल देश आपल्यावर गोळीबार करतो. आपण त्यावर काहीच करत नाही. फक्त पाहत राहतो. इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे ४ ते ५ तुकडे केले असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती सध्या २४ इंचाची झाली असून लोकसभा निवडणुकांपर्यंत ती २० इंचाची होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक