औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांच्या मदतीने करण्यात येत असलेले विविध कारनामे आता उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. एका कारमालकाने बँकेच्या कर्जाची परतफेड केल्याचे बनावट पत्र तयार करून त्याआधारे आरटीओ कार्यालयातून कार दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरण केली. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात कारमालकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुलदीप रावत आणि मुश्ताक पटेल अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, रावत यांनी कार खरेदी करताना गजानन महाराज मंदिर चौकातील स्टेट बँक आॅफ हैदराबादकडून कर्ज घेतले होते. एखाद्या गाडीवरील कर्ज उतरविण्यासंदर्भात जेव्हा आरटीओ कार्यालयाकडे अर्ज दाखल केला जातो. त्यामध्ये फॉर्म नंबर ३५ असतो. हा फॉर्म सत्य आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून बँकेला पत्र पाठविण्यात येते. या प्रकरणात ही पडताळणी करण्यात आली असती, तर ही फसवणूक टळली असती. मात्र आरटीओ कार्यालयातील काही जणांकडून अशा प्रकरणात ‘मदत’ झाली असावी.
बनावट कागदपत्र : दुसऱ्याच्या नावे कारचे हस्तांतरण
By admin | Updated: January 11, 2016 00:06 IST