शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत नशेडी मुलांचे पोलिसांकडून समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:43 IST

: व्हाईटनर, सोल्युशन आणि गोळ्या सेवन करून नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत.

ठळक मुद्देसमुपदेशन करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी आठ दिवसांत ५२ बालकांना नशा करताना पकडले.

औरंगाबाद : व्हाईटनर, सोल्युशन आणि गोळ्या सेवन करून नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी आठ दिवसांत ५२ बालकांना नशा करताना पकडले. त्यांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर या बालकांचे समुपदेशन केले. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.  

डॉ. दीपाली घाडगे म्हणाल्या की, शहराच्या हद्दीतील विविध ठिकाणी व्हाईटनर, सुलोचनची नशा करण्यासोबतच झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले. या प्रकारची नशा करणाऱ्यांमध्ये झोपडपट्टी भागातील अल्पवयीन मुले सर्वाधिक आहेत. आई-बाबांची नजर चुकवून ही मुले नशा करीत असल्याचे निष्पन्न झाले. आज आपल्यासमोर शताब्दीनगर येथील पंधरा आणि नऊ वर्षांची दोन भाऊ त्यांच्या आईसोबत हजर करण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपासून व्हाईटनरची नशा करणाऱ्या पंधरा वर्षांच्या मुलाकडे पाहून तो आठ ते नऊ वर्षांचा असावा असे दिसले.

नशेमुळे त्याचे जेवण कमी झाल्याने त्याची वाढ खुंटल्याचे दिसून आले. त्याच्यासोबत त्याच्या लहान भावालाही व्हाईटनरच्या नशेचे व्यसन लागले. गरीब कुटुंबातील ही मुले असून, त्याची आई धुणीभांडी करते तर वडील गॅरेजवर काम करतात. मोठा एक वर्षापासून तर लहान एक महिन्यापासून शाळेत जात नाही. याविषयी त्याच्या आईला समजले होते. तिने चिमुकल्यांना नशा करू नये म्हणून समजावून सांगून पाहिले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. आज या मुलांचे मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाणार आहे. अशाच प्रकारे शहरातील अन्य नशेखोर मुलांचे समुपदेशन केले जाणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

तीन पथके करणार कारवाईनशेच्या आहारी गेलेल्या मुलांचे वेळीच समुपदेशन झाल्यास त्यांचे आयुष्य बदलू शकते, ही बाब लक्षात घेऊन विशेष शाखेचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण, उपनिरीक्षक सौदागर यांच्यासह तीन पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील. प्रत्येक पथक आठ दिवस शहरात कारवाई करील. त्यानंतर दुसऱ्या सप्ताहात दुसरे पथक  आणि त्यापुढील सप्ताहात अन्य पथक कार्यरत राहील.

टॅग्स :Drugsअमली पदार्थAurangabadऔरंगाबादAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस