शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

दुष्काळझळांना कंटाळून पेटविली मोसंबीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:55 IST

दुष्काळाच्या झळांमुळे मोसंबीचे पीक हातातून गेल्याने हतबल झालेल्या पोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी तब्बल ४५० झाडांवर कुºहाड चालविली. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तळहातावरच्या फोडांप्रमाणे जपलेल्या मोसंबीला जळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, अशी खेदजनक प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककचनेर : दुष्काळाच्या झळांमुळे मोसंबीचे पीक हातातून गेल्याने हतबल झालेल्या पोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जड अंत:करणाने मंगळवारी तब्बल ४५० झाडांवर कुºहाड चालविली. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला असून, तळहातावरच्या फोडांप्रमाणे जपलेल्या मोसंबीला जळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, अशी खेदजनक प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.पैठण तालुक्यातील पोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी मोसंबीचे पीक घेतले होते.पाणी कमी पडल्यानंतर विहिरी खोदून तसेच बोअर घेऊन पिके जगविली. तसेच दरवर्षी मिळेल तेथून पाणी आणून झाडे जगविली. मात्र, यावर्षी अत्यल्प पावसाने येथील तलाव, नदी, नाले, बंधारे कोरडेठाक झाले आहेत. यामुळे पीक हातातून गेल्याने येथील एका शेतकºयाने आपल्या शेतातील तब्बल ४५० मोसंबीच्या झाडांवर कुºहाड चालवून तोडून टाकले.विशेष म्हणजे तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली ही फळबाग पाहवत नसल्याने या शेतकºयाने तोडलेल्या झाडांना आग लावून पेटवून नष्टही केल्याचे दिसून आले. यावरून यावर्षी दुष्काळाची दाहकता किती मोठी आहे. हे दिसून येत आहे.येथील शेतकरी पाराजी संपत गायकवाड यांनी सांगितले की, यंदा दुष्काळाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतातील ४५० झाडांवर कुºहाड चालविण्याची वेळ आली. विशेष म्हणजे पाणी कमी पडल्याने बँकेकडून कर्ज काढून ठिबकचे पाईप विकत घेतले होते. मात्र, आता विहीर, बोअर, नदी, नाले कोरडेठाक पडल्याने झाडांना पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला होता, तर दुसरीकडे वैद्यकीय खर्च तसेच घर चालविणे सध्या कठीण झाल्यामुळे मोसंबी तोडून जाळण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी प्रतिक्रिया सदर शेतकºयाने दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती