शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाड्यात निवडणुकीचा खर्च ९५ कोटींहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 17:49 IST

एका मतदान केंद्रावर ५९ हजार खर्च 

ठळक मुद्देकर्मचारी, प्रवास, भोजन, मतदारांसाठी पाणी आदी सुविधा मराठवाड्यात १६ हजार २१३ मतदान केंद्र

- विकास राऊत  

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या व्यवस्थापनावर मराठवाड्यातील १६ हजार २१३ मतदान केंद्रांसह यंत्रणा व्यवस्थापनासाठी अंदाजे ९५ कोटी रुपयांहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर हा खर्च आयोगाच्या तरतुदीप्रमाणे वितरित केला जातो. हा लवचिक असून, त्यात कमी-अधिक प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत मतदान झाले आहे. औरंगाबाद व जालना मतदारसंघांत २३ रोजी मतदान आहे. विभागीय प्रशासन मराठवाड्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खर्चाची माहिती संकलित करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निवडणूक कामकाजात असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी बसेस व इतर वाहनांची गरज लागते आहे. कर्मचाऱ्यांचे भोजन, प्रवास, मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी पाणीपुरवठा करणे, आवश्यक तिथे शेडस् उभारणे, भरारी पथकांना लागणारे इंधन, इमर्जन्सीमध्ये वीजपुरवठ्यासाठी जनरेटर, खुर्च्या, स्टेशनरी आदी खर्चाचा यामध्ये समावेश असतो. ९५ कोटी रुपयांचा संभाव्य खर्च सूत्रांनी सांगितला असला तरी हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाहन व्यवस्थेसाठी जास्तीची गरज पडली, तर तो खर्चदेखील यंत्रणेला करावा लागतो. विभागात काही मतदान केंद्रे मुख्यालयापासून १०० कि़मी.पेक्षा लांब अंतरावर आहेत. अशा केंद्रांसाठी जास्त खर्च होतो, तसेच सुरक्षेसाठी पोलिसांची कुमकदेखील असते. मतदान मोजणीच्या दिवशीचा खर्च वेगळा असतो. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गरजेनुसार निवडणूक व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या असून, निवडणुकीनंतर आयोगाकडून सदरील खर्चाची पूर्तता केली जाते. 

उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी... औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २,०२१, तर जालना लोकसभा मतदारसंघात १,०४६ मिळून ३,०६७ मतदान केंद्रे आहेत. औरंगाबादेत १,९३६ मुख्य केंद्रे आणि ८२ साह्यकारी केंद्रे त्यामध्ये आहेत. १८ लाख ८६ हजार २९४  मतदार संख्या आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ३५० मतदान केंद्रे असून, सर्वात कमी ३१७ केंद्रे औरंगाबाद पूर्वमध्ये आहेत. मतदान केंद्रावर किती रुपये खर्च होणार याचा अंतिम आकडा अजून काढलेला नाही; परंतु सध्या जिल्ह्यातील ३ हजार ६७ मतदान केंद्रांसाठी १८ कोटींच्या आसपास रक्कम लागेल, असा अंदाज आहे. यावरून केंद्रनिहाय खर्चाचे अनुमान लावता येईल.५८ हजार ६८९ रुपये एका मतदान केंद्रासाठी खर्च होण्याचे हे प्रमाण आहे. हा लवचिक खर्च असतो, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक नीलेश श्रींगी यांनी सांगितले.  

मराठवाड्यातील केंद्रजिल्हा    मतदान केंदे्रऔरंगाबाद    ३,०६७जालना    १,६७८परभणी    १,५४२बीड    २,३३३लातूर    २,०६१हिंगोली    १,०६०नांदेड    २,९७५उस्मानाबाद    १,४९७एकूण    १६,२१३

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Marathwadaमराठवाडा