शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

नगरसेवक ते केंद्रात मंत्री; मोदी सरकारमध्ये औरंगाबादच्या भागवत कराड यांना राज्यमंत्री पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:05 IST

Dr. Bhagvat karad in modi's cabinet : औरंगाबाद शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना १९९६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देडॉ. कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील असून, त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळल्या

औरंगाबाद : राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले असल्याची माहिती भाजप प्रवक्ता शिरीष बोराळकर यांनी सोशल मीडियातून दिली आहे. शेतकरी पुत्र असलेल्या डॉ. कराड यांचा नगरसेवक ते केद्रात मंत्री असा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांना मंत्रिपद देऊन भाजपने एकप्रकारे राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे.  ( Bhagwat Karad of Aurangabad in the Modi government) 

डॉ. कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील असून, त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना १९९६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात भाजप वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन शेतकरी कुटुंबातील डॉ. भागवत कराड यांनी बालपण अत्यंत हालाखीत गेले. रोज ५ किमीची पायपीट करत त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे उच्च शिक्षण घेत ते मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन बनले. औरंगाबाद शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यानंतर काही काळाने भाजपचे सदस्यत्व घेत सक्रीय राजकारणात प्रवेश घेतला. 

राजकीय कारकीर्द : १) भाजपकडून राज्यसभा सदस्य ( २०२० ) २) भाजपचे सभागृह नेते, औरंगाबाद महानगरपालिका (१९९९ -२००९)३) औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर ( एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१ आणि नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७ - २ वेळा महापौर)४) औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर (१९९७-११९८ )५) स्थायी समिती सदस्य, औरंगाबाद महानगरपालिका (१९९५-१९९७ )६) औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक ( १९९५ ते २०१० या काळात तीन वेळा )  

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदी