शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महापालिकेने ‘कोरोना निगेटिव्ह’ प्रमाणपत्र दिले नाही; व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लावल्या पाट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 19:40 IST

कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची ही पद्धत नैतिकदृष्ट्या योग्य नसून, हा प्रकार आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना प्रमाणपत्रावरून व्यापारी संतप्तमहापालिका व्यापाऱ्यांना देणार ऑनलाईन प्रमाणपत्र

औरंगाबाद : कोरोना टेस्ट करवून घेण्याची महापालिकेने व्यापाऱ्यांना सक्ती केली. मात्र ‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र  महापालिकेने दिले नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी केली, मी निगेटिव्ह आलो; पण मनपाने अजून प्रमाणपत्र दिले नाही’, अशा पाट्या लावल्या आहेत. दरम्यान, कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची ही पद्धत नैतिकदृष्ट्या योग्य नसून, हा प्रकार आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाली आहे. शिवाय कोरोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या देण्यासही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. 

महापालिकेतर्फे सध्या व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्याचे काम चालू आहे. कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दुकानात लावल्याशिवाय व्यापार सुरू करता येणार नाही. अनेक जणांनी टेस्ट करवून घेतल्या. मात्र, त्यांंना महापालिकेचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. काही ग्राहक व्यापाऱ्यांना ‘कोरोना टेस्ट’ करवून घेतली का, अशी विचारणा करीत आहेत. यामुळे अनेक  व्यापाऱ्यांनी ‘मनपाने अजून प्रमाणपत्र दिले नाही’, अशा पाट्या लावल्या आहेत.

यासंदर्भात किराणा व्यापारी संजय मुथियान यांनी सांगितले की, मनपाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने अखेर दुकानासमोर ‘मनपाकडून कोरोना तपासणी केली व मी निगेटिव्ह आलो आहे. अजून प्रमाणपत्र मिळाले नाही’ , अशी पाटी लावली. अडत व्यापारी मुजीब खान यांनी सांगितले की, अनलॉक सुरू होऊन ४ दिवस झाले. मनपाने अजूनही जाधववडीतील अडत्या, हमालांसाठी स्वतंत्र तपासणी शिबीर घेतले नाही. अशाच प्रकारची तक्रार दूध विक्रेते आणि शाहगंज व औरंगपुरा येथील भाजीविक्रेत्यांनी केली आहे. 

महापालिका व्यापाऱ्यांना देणार आॅनलाईन प्रमाणपत्रमहापालिकेकडून गुरुवारपासून टेस्ट करण्यात आलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याला आॅनलाईन पद्धतीने मोबाईलवर कोविड निगेटिव्ह असल्याचा मेसेज प्राप्त होणार आहे. दुकानांची तपासणी करताना संबंधित व्यापाऱ्याच्या मोबाईलवरील लिंक तपासली जाणार आहे, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. प्रत्येक व्यापाऱ्याला उद्यापासून राज्य शासनाच्या पोर्टलवरून आपण कोविड निगेटिव्ह आहात, भविष्यात सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, असा संदेश येईल.  हा मेसेज डुप्लिकेट स्वरूपात कोणालाही तयार करता येणार नाही. मेसेज फॉरवर्ड करता येईल; पण त्याची बोगस लिंक तयार करता येणार नाही. ९९ टक्के व्यापाऱ्यांना मेसेज टाकण्याची व्यवस्था महापालिकेच्या कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका प्रत्येक टेस्ट केलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीचे आॅनलाईन प्रमाणपत्र देणार आहे. 

महासंघाने घेतली हरकतशहरातील व्यापारी येथील नागरिक आहेत. मात्र, मनपा दररोज एवढे व्यापारी पॉझिटिव्ह निघाले, असे जाहीर करीत आहे, हे चुकीचे आहे. त्याचा शहरातील व्यवसायावर परिणाम झाला आहे. मनपाने किती व्यापारी पॉझिटिव्ह निघाले हे जाहीर करू नये. इतर नागरिकांबरोबरच त्याची नोंद करावी, तसेच केंद्रावर मोठ्या रांगा न लावता सर्वांना टोकन देऊन त्या वेळेनुसार बोलवावे. व्यापाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यास आम्ही हरकत घेतली आहे. - लक्ष्मीनारायण राठी,  महासचिव, व्यापारी महासंघ 

गुप्तता ठेवायची तिथे प्रमाणपत्र अयोग्यचकोरोना पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह, तपासणी केलेल्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवणे प्रशासनाचे काम आहे. सुमारे १५ हजार व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट झाली. त्यांच्यातील जे  निगेटिव्ह आले त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे मनपाने जाहीर केले आहे. मात्र, अजून कोणालाच प्रमाणपत्र दिले नाही. मुळात माहिती गुप्त ठेवायची असल्याने मनपा कोरोना निगेटिव्ह व्यापाऱ्यांना प्रमाणपत्र कसे काय देऊ शकते, असे प्रमाणपत्र दुकानात लावणे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. - अजय शहा, व्यापारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद