शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये आणखी २४ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ६५१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 08:57 IST

शहरात कोरोनामुक्त आणि नव्या भागातही संक्रमण वाढत आहे. पाच दिवसात तब्बल २७३ रुग्णांची भर पडल्याने शहरावसीयांना मोठा धक्का बसला आहे.

औरंगाबाद :  मंगळवारी सकाळच्या सत्रात २४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ६५१ झाला आहे,अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहरात कोरोनामुक्त आणि नव्या भागातही संक्रमण वाढत आहे. पाच दिवसात तब्बल २७३ रुग्णांची भर पडल्याने शहरावसीयांना मोठा धक्का बसला आहे.

मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांत नऊ महिला 16 पुरुषांचा समावेश आहे. यात पुंडलिक नगर 2 येथील, एन 8 येथील 1, रामनगर 1 , संजयनगर 5, प्रकाशनगर 1, एन 7 येथील 4, रोशनगेट, गांधीनगर 1, दत्त नगर 1, भडकलगेट 1, चिकलठाणा 1, शहानुरमियाँ दर्गा येथील 1, अन्य दोन ठिकाणचे दोन आणि महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला बाधा झाली असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले

पाच दिवसात २७३बाधितांची भरदरम्यान, शहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १००, शनिवारी ३० आणि रविवारी ५०, सोमवारी ६९, मंगळवारी २४ अशा तब्बल २७३ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. यात नव्या भागांतील तसेच कोरोनामुक्त भागांतही संक्रमण होत असल्याने चिंतेत भर पडली असुन आरोग्य विभागाकडून काॅन्टक्ट ट्रेसिंगवर भर देण्यत येत आहे. जिल्हा रुग्णालयात भरती रुग्णांना लक्षणे नसल्यास त्यांना तपासण्या करुन स्थिर झाल्यावर पाचव्या दिवशी महापालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात डिस्चार्जचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढेल असे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

सोमवारी सोळा भागात आढळले रुग्णसातारा गाव १, कोतवाल पुरा या नव्या भागात १, तर कोरोनामुक्त झालेल्या सिडको एन-4 सिडकोमध्ये १ रुग्ण आढळून आला. न्याय नगर २, संजय नगर १, सदानंद नगर, सातारा परिसर ८, बीड बायपास रोड १, भवानी नगर , जुना मोंढा ५, पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक सहा १, दत्त नगर-कैलास नगर ५,  कैलास नगर १, बायजीपुरा १, राम नगर २२, किल्ले अर्क ८, एसआरपीएफ-सातारा परिसर १,  गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा ५ रुग्णांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले. या रुग्णांमध्ये ३६ पुरूष आणि २६ महिलांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद