शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पुर्ण पगार मिळेल की नाही; मोलमजूरी करणाऱ्या महिलाही आर्थिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 18:58 IST

६५ ते ७० टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसक्तीची सुटी कष्टकरी महिलांना नकोशी झाली आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येकावरच झाला आहे. घराघरांमध्ये मोलमजूरी करून पोट भरणाऱ्या मोलकरणींनाही आता आर्थिक चिंतेने घेरले आहे. कारण लॉकडाऊनची घोषणा होताच जवळपास ६५ ते ७० टक्के घरांमध्ये मोलकरणींना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ही सक्तीची सुटी कष्टकरी महिलांना नकोशी झाली आहे. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु झाला, दि. २३ रोजी सायंकाळी मुख्यमंंत्र्यांनी संचारबंदीची आणि २४ रोजी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासूनच बहुतांश घराचे दरवाजे मोलकरणींसाठी बंद झाले. घरकाम करायला येणारी एक महिला आणखी दोन- चार घरची कामे करून येते. त्यामुळे या महिलांपासूनही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच धास्तीने अनेक घरांमध्ये महिलांनी कामाला येणाऱ्या महिलांना सुटी देऊन घरातली सगळी कामे स्वत:च करायला सुरूवात केली आहे. अशीच परिस्थिती पुढील काही महिने कायम राहिली तर येणाºया आर्थिक संकटाला कसे तोंड द्यायचे, हा प्रश्न आता या महिलांना पडला आहे.

पगार देऊ, पण किती महिनेघरोघरी जाऊन मोलमजूरी करणाऱ्या महिलांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी घरी थांबणेच योग्य आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून सुट्या गृहित न धरता या महिन्याचा पगार तर बहुतांश घरांमधून त्यांना दिला जाणार आहेच. पण सध्या दि. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. मग अर्धा महिना सुटी झाली तरी एप्रिल महिन्याचा पगारही पुर्ण द्यायचा का, असा प्रश्न आहे. याशिवाय पुढील २ ते ३ महिने अशीच परिस्थिती राहिली आणि त्या महिलांना कामावर येता आले नाही, तर आम्हालाही विचार करावा लागेल. कारण या लॉकडाऊनचा परिणाम आमच्याही उत्पन्नावर नक्कीच होणार आहे, असे काही गृहिणींनी सांगितले.

घरखर्च भागवणे कठीण होत आहेघरात आम्ही ८ ते १० लोक आहोत. प्रत्येकाच्याच कामावर परिणाम झाला आहे त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण होत आहे. काही घरांमध्ये आमचा पगार कापणार नाही, असे सांगितले आहे. पण पुढे काही महिने असेच चालू राहिले, तर आम्हाला तरी बिना कामाचा पगार लोक किती महिने देतील. त्यामुळे आम्हालाही चिंता पडली आहे, असे घरकाम करणाऱ्या अलका खंडागळे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद