शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ गेले शेतात; चोरांच्या भीतीने पुन्हा परतले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 21:10 IST

पैठण तालुक्यातील सुलतानपूरचे ग्रामस्थ सापडले कात्रीत

ठळक मुद्देगावकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहिर’

- सुनील गिऱ्हे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांची संबध येऊ नये, म्हणून शेताचा रस्ता धरलेल्या नागरिकांना चोरांच्या भीतीमुळे पुन्हा गावची वाट धरावी लागली आहे. एकूणच ‘इकडे आड तिकडे विहिर’ या म्हणीप्रमाणे पैठण तालुक्यातील सुलतानपूरच्या (गारखेडा) नागरिकांची अवस्था झाली असून ज्या गोष्टीपासून नागरिक दुर जात होते. त्याच गोष्टीचा पुन्हा सामना करावा लागणार असल्याने ग्रामस्थांसमोर पेच निर्माण झाला आहे.------------------रांजणगाव दांडगा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जवळपास दिडशे उंबºयांचे सुलतानपूर (गारखेडा) हे गाव सोलापूर-धुळे माहामार्गापासून १५ कि़मी. अंतरावर असून येथील बहुतांश नागरिक शेतीवर आपला उदारनिर्वाह चालवितात. काही तूरळक नागकिर मुंबई, पुणेसह इतर ठिकाणी काम करून उपजीविका भागवितात. कोरोनाच्या पार्श्वभूमीर सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गावात झंजट नको म्हणून येथील बहुतांश कुटूंबियांनी जवळपास महिनाभरापासून आपले बस्तान गावातून शेतात हलविले होते. मात्र, २० एप्रिल रोजी रात्री शेतकरी तुकाराम दौंड यांच्या शेतात चोर आल्याची घटना घडली. लोखंडी पेटीचा आवाज आल्याने शेतकऱ्याला जाग आली. आरडोओरड झाल्याने चोरटे मोसंबीच्या बागेत पळून गेले. या घटनेची माहिती गावासह शेतात राहणाºया नागरिकांत वाऱ्यासारखी परसली.  या घटनेनंतर शेतात राहणाऱ्या चार ते पाच कुटूंबियांनी रातोरात चोरांच्या भीतीने शेतातून गाव गाठले तर काही नागरिकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आपले बस्तान गावात हलविले. सध्या केवळ जे शेतकरी गटा गटाने वास्तव्यास आहेत. तेच शेतात राहायला असून ज्या शेतकºयांचे एकच कुटूंब शेतात गेले होते. त्या सर्वांनी आता गाव जवळ करणेच पसंत केले आहे. 

 ६० टक्के नागरिकांचे स्थलांतर - सुलतानूपर येथील जवळपास ६० टक्के नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने शेतात आपला संसार थाटला होता. मात्र, चोरांची आवई उठल्याने २५ ते ३० टक्के नागरिक पुन्हा गावात आले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गावातील गर्दीपासून दुर जाण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा चोरांच्या भीतीमुळे गावात यावे लागत असल्याने येथील                                     पोलीस पाटील महादेव दौंड, ग्रा.पं. सदस्य अजिनाथ दौंड, भारत दौंड, नितीन दौंड, यांनी खंत व्यक्त केली.

पुन्हा भर दिवसा चोरी-विशेष म्हणजे गुरूवारी पुन्हा गावात भर दिवसा चोरी झाल्याने गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, गावातीच व्यक्तीने पाळत ठेवून हे कृत्य केल्याचे उघड झाले. यानंतर सदर व्यक्तीने चोरी केल्याचे कबुल करून मुद्देमाल परत केल्याने त्याच्याविरूद्ध फिर्याद देण्यात आली नाही. या घटनेनंतर पुन्हा शेताततून गावात येणाºया शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

नाईलाजाने यावे लागले शेतातून घरी - गावात चार ते पाच जण होम क्वारंटाईन होते. त्यांच्यासह गावातील इतर लोकांशी संपर्क येऊ नये, म्हणून अनेकांनी शेतात संसार थाटला होता. मात्र, चोरींच्या घटनेमुळे बहुतांश नागरिकांना मजबुरीने पुन्हा गावात यावे, लागत असल्याची प्रतिक्रिया गजानन दौंड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादtheftचोरी