शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुकान उघडण्याबाबत व्यापाऱ्यांनी घाई करू नये; राज्य शासनाच्या आदेशाची वाट पाहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:50 IST

CoronaVirus lockdown : पुढील आदेश येईपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची घाई करू नये, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.

औरंगाबाद : दुकाने उघडण्यासंदर्भात राज्यशासनाचे आदेश अद्याप जिल्हाधिकाऱ्यांना आले नाहीत. यामुळे शहरात जैसे थे परिस्थिती आहे. पुढील आदेश येईपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याची घाई करू नये, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या भेटीनंतर त्यांनी लोकमतला ही माहिती दिली.

केंद्र सरकारने शनिवारपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. लॉकडाऊनपुर्वीच दुकाने उघडण्याबाबत केंद्र सरकारकडून सुट देण्यात आली असली तर नियमांबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट निर्देश येत नाहीत, तोपर्यंत दुकाने उघडली जाणार नसल्याची भूमिका जिल्हा व्यापारी महासंघाने घेतली आहे. केंद्र सरकारच्या नव्या आदेशावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतली. यानंतर काळे यांनी सांगितले की, राज्य शासनाचे अद्याप आदेश आले नसून याबाबत दोन तीन दिवसात निर्णय होऊ शकतो. इतर दुकाने उघड्याबाबत राज्य शासन तथा जिल्हा प्रशासन सकारात्मक निर्णय घेतील अशी आहे. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत. सूट असलेली दुकाने पूर्वी प्रमाणेच सुरू राहतील मात्र इतर दुकानांबाबत राज्य शासनाचा निर्णय होई पर्यंत सर्वांनी वाट पहावी. घाई करू नये.

दरम्यान,  लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून अन्य दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद