शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शहरात स्वॅब घेण्यासाठी दहा मोबाईल पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:50 IST

शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे तेथे मोबाईल व्हॅनद्वारे लाळेचे नमुने घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देहाय रिस्क असलेल्या रुग्णाचे नमुने घेऊन त्याला त्वरित महापालिकेच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल.जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी केल्यास समूह संसर्ग होणार नाही, असा विश्वास प्रशासनाला आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय मंगळवारी महापालिका प्रशासनाने घेतला. नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यासाठी १० स्वतंत्र मोबाईल पथक नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. तपासणीसाठी पुढील पंधरा दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केली.

महापालिकेत मंगळवारी दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही व्यापक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे तेथे मोबाईल व्हॅनद्वारे लाळेचे नमुने घेण्यात येणार आहेत. हाय रिस्क असलेल्या रुग्णाचे नमुने घेऊन त्याला त्वरित महापालिकेच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. लो रिस्क रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन त्याला घरातच अलगीकरण करून ठेवण्यात येईल. या कामासाठी महापालिकेच्या १० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. एका पथकात डॉक्टर आणि आणखीन चार कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी केल्यास समूह संसर्ग होणार नाही, असा विश्वास प्रशासनाला आहे.

बैठकीतील ठळक निर्णय- वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी परिपत्रक काढून निश्चित करावी. यामध्ये कॉन्टॅक्ट मॅपिंग(संशयितांचा शोध घेणे), चाचण्या करणे, रुग्णांना हलवणे, कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण इत्यादी.

- ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या लाळेचे नमुने घ्यावेत. - स्वॅब कलेक्शन आपल्या दारी हे अभियान राबवून संशयितांचे लाळेचे नमुने जागेवरच घ्यावे. ज्या भागात लाळेचे नमुने घ्यायचे आहेत त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे.- गर्दी न करता एक एक माणूस बोलवून त्यांचे लाळाचे नमुने घ्यावे. - ज्या शहर बसने रुग्णांची ने- आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल असा स्वॅब कलेक्शन आपल्या दारी असा बोर्ड लावावा.- प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत ‘‘कोरोना प्रतिबंधक समिती’’ करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करावे. - प्लाझ्मा थेरपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता इत्यादी तपशिलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद