शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

coronavirus : 'ट्रेस-टेस्ट-आयसोलेट'मध्ये औरंगाबाद महापालिका देशात दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 17:33 IST

औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे.

ठळक मुद्देअँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवरशहरात पॉझिटिव्हची टक्केवारी २८ वरून ११ वर आली 

औरंगाबाद :  कोविड-१९ मध्ये गत चार महिन्यांत महापालिकेने प्रगत तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला. टीटीआय (ट्रेस-टेस्ट-आयसोलेट) म्हणजेच रुग्ण शोधणे, त्याची तपासणी करणे आणि वेळीच उपचार करणे यामध्ये औरंगाबाद शहराने देशात दुसरे स्थान पटकावले आहे. औरंगाबादेत ६६ हजार तपासण्या करण्यात आल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत १ लाख तपासण्या पूर्ण होतील, असा विश्वास महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णवाढीची टक्केवारी २८ वरुन ११ टक्क्यांवर आली आहे.  टीटीआयमध्ये गोवा राज्य प्रथम आहे.

दहा लाख नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून तपासणीचे हे गणित अधिक तपशीलवार समजावून सांगताना पाण्डेय यांनी नमूद केले की, दिल्लीत दहा लाख नागरिकांमागे ४३ हजार, जम्मू- काश्मीरमध्ये ३८ हजार, आंध्र प्रदेशमध्ये २५ हजार, राजस्थान १६ हजार, महाराष्ट्र १४ हजार नागरिकांच्या तपासण्या होतात. औरंगाबाद येथील सतरा लाख लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून ६६ हजार तपासण्या हा सर्वाधिक उच्चांक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण आता ३.७ टक्क्यांवर आले आहे. मागील महिन्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८ टक्के होते. आता हे प्रमाण ११ टक्क्यांवर आले आहे. 

कोरोनातील ७ प्रभावी कामेऔरंगाबाद महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्समध्ये आता ३५ कर्मचारी काम करीत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, मॅपिंग, हाय रिस्क रुग्णांचा शोध घेण्याची पद्धत इतर कोणत्याच महापालिकेत नाही. २४ तास ७ दिवस सतत कंट्रोल रूम सुरू असून, याद्वारे अनेक कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात येत आहेत. मोबाईल फिव्हर क्लीनिक, १ लाख ४ हजार ८७९ ज्येष्ठ नागरिकांवर वॉच ठेवण्याचे काम येथूनच होते. अनेकदा डॉक्टरसुद्धा त्यांना मार्गदर्शन करतात. एमएचएमएच अ‍ॅप तयार करून द्या, अशी मागणी राज्यातील पाच महापालिकांनी केली आहे. शहरातील व्यापाऱ्यांची स्वतंत्रपणे तपासणी करणारी औरंगाबाद महापालिका एकमेव आहे. 

खर्च ३ हजारांवरून ५०० रुपयेलाळेचे नमुने घेऊन तपासणी करण्याचा एका व्यक्तीचा खर्च तीन हजार रुपये आहे. अँटिबॉडीज टेस्ट या प्रकाराचा खर्चही ३ हजार रुपयांपर्यंत जात आहे. अँटिजन टेस्ट (आरटीपीसीआर) ५०० रुपयांमध्ये होत आहेत. भविष्यात व्यापारी आणि इतर विक्रेत्यांना ही टेस्ट ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्याने टेस्ट केलेली असेल, त्याच सुरक्षित व्यापाऱ्याकडून सामान खरेदी करावे, अशी औरंगाबादकरांना विनंती राहणार आहे.

अँटिजन टेस्टमध्येही औरंगाबाद आघाडीवरऔरंगाबाद महापालिकेने अत्याधुनिक आणि अत्यंत स्वस्त अँटिजन टेस्टचा वापर सुरू केल्यानंतर आता राज्यातील इतर महापालिकांनी यादृष्टीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. बाजारात कीट उपलब्ध नाहीत. सोलापूर महापालिकेला औरंगाबाद दहा हजार कीट उसने देणार आहे. ३१ जुलैपर्यंत औरंगाबाद शहरात एक लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झालेली असेल. व्यापाऱ्यांच्या २० हजार तपासण्यांमध्ये ५०७ पॉझिटिव्ह आढळून आले. सार्वजिनक ठिकाणे सुरक्षित राहावीत हा त्यामागचा उद्देश आहे. ३०० सलून चालकांची तपासणी केली. त्यामध्ये ९ पॉझिटिव्ह आढळून आले.

आजचा निगेटिव्ह, उद्या पॉझिटिव्ह असू शकतोअँटिजन टेस्टबद्दल शहरामध्ये काही नागरिक भ्रम पसरवीत आहेत. आज एखाद्या नागरिकाची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी दुसऱ्या दिवशी उद्या त्याची टेस्ट पॉझिटिव्हसुद्धा येऊ शकते. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद