शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

घराशेजारीच खरेदी करा; खरेदीसाठी वाहन घेऊन बाहेर पडाल, तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:59 IST

 जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा इशारा

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पायीच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त केली जातील, असा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज दिला.

पोलीस आयुक्त कार्यालयात कोरोना स्थितीविषयी  पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त  डॉ. नागनाथ कोडे उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत  मोठ्या संख्येने लोक बिनधास्तपणे वाहने घेऊन घराबाहेर पडतात. नागरिकांना त्यांच्या कॉलनीत किंवा घराजवळ जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असताना अनेकजण दुचाकी घेऊन खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडतात. यामुळे गर्दी होते आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. यामुळे दुचाकीच्या हँडलला पिशवी लटकावून घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे वाहन जप्त केले जाणार आहे. प्रशासनाने सलग सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन केले. त्याचा परिणाम चांगला झाल्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव काही काळ राहणार असून आगामी काळातही नागरिकांनी मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे हा नियम कायमस्वरुपी पाळावा लागेल, असे ते म्हणाले. 

वसाहतीतच जीवनावश्यक वस्तू खरेदी करा कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्या वसाहतीत अथवा परिसरातच  जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. सिडको अथवा गारखेड्याचा माणूस वाहन घेऊन गुलमंडीवर अथवा गुलमंडीच्या नागरिकाने कॅनॉट प्लेसमध्ये  खरेदीसाठी जाऊ नये. याकरिता लवकरच नियमावली आणली जाईल, असे ते म्हणाले. याशिवाय नागरिकांनी  गर्दी करू नये. मास्क वापरावा आणि सहा फुटांपर्यंत शारीरिक अंतर राखावे, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस