शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

CoronaVirus : धक्कादायक ! शहरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:57 IST

औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी २० एप्रिल रोजी ७ दिवस, असा मोजला जात होता. त्यानंतरही शहरात दररोज एक, दोन नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला होता.

ठळक मुद्देपाच दिवसांतच रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ९ दिवसांवरून ६ दिवसांवर

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचे रुग्ण दुप्पट (डबलिंग रेट) होण्याचा वेग वाढला असून, हा वेग गेल्या पाच दिवसांत ९ दिवसांवरून ६ दिवसांवर आला आहे.

औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याचा कालावधी २० एप्रिल रोजी ७ दिवस, असा मोजला जात होता. त्यानंतरही शहरात दररोज एक, दोन नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला होता. २७ एप्रिल रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ९.२ दिवसांवर आला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु याच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होण्यास सुरुवात झाली. या दिवशी २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. हा औरंगाबादकरांसाठी मोठा धक्का होता. यानंतरच्या पुढील प्रत्येक दिवशी शहरात २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. ३० एप्रिल रोजी सर्वाधिक ४७ रुग्णांचे निदान झाले. परिणामी रुग्ण दुप्पट होण्याची गतीही वाढली. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी म्हणाले, सध्या रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६.३ दिवसांवर आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार सुरू आहे. नवीन रूग्ण आढळून आले तरी त्यांच्या उपचाराची सुविधा शहरात करण्यात आलेली आहे. 

असे काढले जाते रुग्ण दुपट होण्याचा वेग शहरात १५ मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर दुसरा रुग्ण थेट २ एप्रिल रोजी दोन रुग्ण आढळून आले होते. यानुसार एका रुग्णाचे दोन, दोनाचे चार, चार रुग्णांचे आठ रुग्ण कधी झाले, यानुसार रुग्ण दुप्पट होण्याचा वेग किती दिवसांवर आहे, हे काढले जात असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले.

 रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २० एप्रिल - ७.२ दिवस २७ एप्रिल - ९.२ दिवस २८ एप्रिल - ६.८ दिवस २ मे - ६.३ दिवस असे वाढले गेल्या १४ दिवसांत रुग्ण दिनांक रुग्णसंख्या १९ एप्रिल २ २० एप्रिल १ २१ एप्रिल ४ २२ एप्रिल २ २३ एप्रिल २ २४ एप्रिल ४ २५ एप्रिल ५ २६ एप्रिल ४ २७ एप्रिल २९ २८ एप्रिल २७ २९ एप्रिल २१ ३० एप्रिल ४७ १ मे ३९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद