शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

coronavirus : धक्कादायक ! खाजगी रुग्णालयांच्या बिलात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 19:20 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने केली ४०९ बिलांची उलटतपासणी

ठळक मुद्दे२४ लाखांचे जास्तीचे बिल आकारले रिटल टाईममध्ये बिले तपासली

- विकास राऊत

औरंगाबाद : खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये जास्तीची बिले आकारण्याच्या तक्रारी आल्यानंतर याबाबत नेमलेल्या समितीने शहरातील काही खाजगी रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली असता ४०९ बिलांमध्ये २४ लाख रुपयांचे जास्तीचे बिल आकारल्याचे उघड झाले. ही रक्कम रुग्णांना परत करण्याबाबत समिती निर्णय घेईल.

खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये जास्तीचे बिल आकारल्यासंदर्भात सत्यता आढळली तर संबंधित रुग्णालयाकडून बिल वसूल करण्याचे अधिकार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना ९ जुलै रोजी दिले होते. त्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यावरून रिअल टाईममध्ये बिले तपासून शासनाने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार बिले असल्याची खात्री करण्यासाठी मनपा आणि प्रशासनाची संयुक्त समिती काम करीत आहे, तसेच हॉस्पिटल्समध्ये ८० टक्के बेडस मिळाले की नाही, यासाठी परीक्षक नेमले आहेत.

यापलीकडे शासनाने प्रतिदिन उपचाराचे जे दर ठरविले आहेत, त्याचेही परीक्षण होणार आहे. जर खाजगी हॉस्पिटल्सने कोविड रुग्णांकडून शासनाच्या नियमापेक्षा जास्तीचे बिल आकारले, तर ते बिल आॅडिटरकडून तपासून त्यावर त्यांची स्वाक्षरी समिती घेत आहे. ज्यादा बिल आकारणी केल्याचे आढळल्यास बिलात कपातीची सूचना समितीने केलेली आहे. या समितीमध्ये लेखा परीक्षक आणि फिरत्या पथकातील १९ जणांचा समावेश आहे. शहरातील विविध खाजगी रुग्णालयाकडून जास्तीची बिले आकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

खासगी रुग्णालयांचे म्हणणे असे...१. कमलनयन बजाज हॉस्पिटलचे डॉ. अलोक श्रीवास्तव यांनी म्हणाले, कोरोना रुग्णाच्या उपचारार्थ दिलेल्या बिलांत तफावत आल्याची माहिती प्रशासनाकडून आम्हाला मिळालेली नाही. जोपर्यंत पूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत काही सांगता येणार नाही. २. एमजीएमचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले, व्हेंटिलेटरचे बिल होते, त्यांचे पॅकेज होते. आमच्या सिस्टिममध्ये त्याची नोंद नव्हती. याबाबत समितीला स्पष्टीकरण दिलेले आहे. दुसरे फूड बिल होते, ते रुग्णांच्या मागणीवरूनच होते. रिफंड करावे, असे कोणतेही आदेश आम्हाला प्रशासनाने अजून तरी दिलेले नाहीत. ३. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल्सचे डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितले, सरकारच्या बिलांसाठी तीन कॅटेगिरी आहेत. २० टक्के बेड्ससाठी सरकारचे काही बंधन नाही. त्याचे बिल शासकीय नियमांशी जुळणे शक्य नाही. याचे स्पष्टीकरण अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे दिले आहे. ९४ बिलांत साडेतीन लाखांचा भागाकार केला तर खूप रक्कम आहे, असे वाटत नाही. ४. सिग्मा हॉस्पिटल्सचे डॉ. उन्मेष टाकळकर यांनी सांगितले, बिलांच्या पडताळणीत काहीही नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी शहानिशा केली आहे. काही विम्याची बिले आहेत, त्यातच आमची बिले शासनाच्या नियमानुसार आहेत. अजूनही अनेक बिले पूर्ण झालेली नाहीत. 

रिटल टाईममध्ये बिले तपासलीसमितीने  ४०९ बिलांची पारदर्शकपणे तपासणी केली आहे. मुद्दामहून वाढीव बिलांचा प्रकार घडत नाही. हॉस्पिटल प्रशासकीय पातळीवर बिलांमध्ये तफावत झाली असेल, समितीने रिटल टाईममध्ये बिले तपासली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करून तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.- उदय चौधरी,  जिल्हाधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद