शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने कसाबखेडा ग्रामस्थांवर बहिष्कार; इतर गावांनी संपर्क तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:09 IST

औरंगाबादयेथून आलेली महिला गावात आल्यानंतर पॉझीटीव्ह निघाल्यानेकसाबखेडा ग्रामस्थांना वाईट अनूभवास सामोरे जावेे लागत आहे.

ठळक मुद्देअनेकांनी तोडला संपर्क , हिनदर्जाची मिळत आहे वागणूकगावातील व्यापाऱ्यांना खरेदीसाठी न येण्याचे निरोप

- सुनील घोडके 

खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गावात लेकीकडे आलेली महिला पॉझिटिव्ह निघाल्याने भीतीबरोबरच वाईट अनुभवाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीने  गावातील लोकांशी अनेकांनी संपर्क तोडला आहे. तर बाहेर गावच्या दुकानदारांनीसुद्धा दुकानात न येण्याचे निरोप दििलाव आहेत. ना गेल्या तीन दिवसापासून हिन वागणूक मिळत असून अनेक वाईट अनूभवास सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कसाबखेडा येथे 17 एप्रिल रोजी औरंगाबाद येथील आसेफिया कॉलनीतील 65 वर्षीय महिला लेकीकडे आली होती. ग्रामस्थांनी तिची कोरोना तपासणी करावयास भाग पडल्याने 20 एप्रिल रोजी सदरील महिला पॉझीटीव्ह निघाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची नुकतीच तपासणी करून त्यांना होम क्वोरंटाईन करण्यात आले आहे. 

दरम्यान, कसाबखेडा गावात कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंरतू या घटनेनंतर कसाबखेडा ग्रामस्थांशी अनेकांनी संपर्क तोडला आहे.  येथील अनेक छोटे मोठे दुकानदार लासूर स्टेशन  येथील व्यापा-यांकडून माल घेतात मात्र, त्यांना दुकानात येवू नका असा निरोप देण्यात आला आहे. त्याचबरोबर परिसरातील छोट्या गावचे नागरिकही दैनदिन खरेदीसाठी कसाबखेड्यात येत असत पंरतू त्यांनीही गावाकडे पाठ फिरविली आहे. कसाबखेडा गावच्या नागरिकांस कुणी जवळही येवू देत नसल्याने ग्रामस्थांना एकप्रकारे हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या सर्व गोष्टींचा गावातील नागरीक व व्यापारी वर्ग  यांना  मोठी किंमत चुकवावी लागत आहे. जीवनमनावर विपरीत परिणाम झाला आहे.

 येथे मोसंबी, चिंचेचे व इतर व्यापारी मोठ्या संख्येने असुन संबंधित गावात शेतकरी यांचेकडे जायचे असल्यास रस्त्या रस्त्यावर अडवणूक होऊन हिन वागणूक मिळत आहे. गावातील नागरिकांना अनेक वाईट अनुभव येत असून गावात निराशेचे वातावरण निर्माण झाल्याने गाव चिंताग्रस्त झाल्याचे चित्र  आहे. संपर्कात आलेले सर्व  नागरीक निगेटिव्ह असल्याने परिसरातील गावांनी कोणतीही शंका बाळगू नये अशी अपेक्षा कसाबखेडा ग्रामस्थ व्यक्त  करत आहेत. दरम्यान,पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे.त्यांची 25 एप्रिल रोजी दुसरी तपासणी करण्यात येणार आहे.

प्रशासनाने दखल घ्यावीयाबाबत गावचे सरपंच नईम महेबूब पटेल म्हणाले की, कसाबखेडा गावातील चार दिवसाच्या घटनेनंतर घबराटीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेे गावात चिंच व मोसंबीचे व्यापारी मोठ्या प्रमाणावर असून त्यांना चिंच व मोसंबी खरेदीसाठी बाहेर गावचे लोक रस्त्यावरच अडवूण माघारी पाठवत आहे. अनेकांनी गावाच्या लोकांशी संपर्क तोडला आहे. लासूर स्टेशन बाजारपेठेत ही व्यापारी व नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी.

नागरिकांना हीन वागणूक मिळतं आहेग्रामपंचायतीचे सदस्य सुनील औटे पाटील म्हणाले की, सदरील महिला कसाबखेडा गावची नसून ती औरंगाबाद येथील आहे. ग्रामस्थांनीच तिला गावात आल्याबरोबर तपासणीसाठी पाठविले. पंरतू या घटनेनंतर गावातील प्रत्येक नागरिकांकडे बाहेरचे लोक संशयाने पाहत असून हिनदर्जाची वागणूक मिळत आहे. याबाबत सरकारने काही तरी केले पाहिजे कसाबखेडा गाव भारतातीलच असून आम्ही काही दुस-या देशातील नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद