शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पैठणकरांना दिलासा ! कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 18:55 IST

घाटी रुग्णालयातील ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह असून त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री पैठणची आहे

ठळक मुद्देपैठणच्या शशी विहार परिसराने घेतला मोकळा श्वास

पैठण : शहरातील शशीविहार परिसरातील सहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. नेमका अहवाल काय येतो या शंकेने पैठणकरांची धाकधूक वाढली होती. परंतु, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पैठण करांचा जीव भांड्यात पडला आहे.

घाटी रूग्णालय औरंगाबाद येथील कोरोनाची लागण झालेला ब्रदर पैठण येथील शशी विहार परिसरातील नातेवाईकांकडे येऊन गेल्याची माहीती समोर आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून  कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या  वसाहतीतील सहा नागरिकांचे  कोरोना टेस्टसाठी रविवारी स्वँब घेतले होते. दोन दिवसा पासून त्यांचा अहवाल काय येईल या शंकेने पैठण शहराची धाकधूक मात्र वाढली होती. आज दुपारी तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी त्या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची पुष्टी केली. यानंतर सर्व शहरातील काळजीचे सावट दूर झाले.

कोरोना बाधित ब्रदर शशीविहार परिसरातील नातेवाईकांकडे येऊन गेल्या नंतर सोमवारी या भागातील जवळपास २०० नागरिकांना होम क्वारंटाईन करून परिसर सील करण्यात आला होता. 

आज शासकीय रूग्णालयातील डॉ संदिप रगडे, तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, आरोग्य पथकातील कर्मचारी, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, स्वच्छता सभापती भूषण कावसानकर आदीच्या पथकाने शशीविहार भागात जाऊन नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू दूध, भाजीपाला आदी उपलब्ध करून दिले. तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, डॉ संदिप रगडे यांनी आज परत एकदा या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत सर्व रहिवाशी ठणठणीत आढळून आले.

दरम्यान, या परिसरातील नागरिक निगेटिव्ह आले असले तरी शशी विहार वसाहतीतील कोरंटाईन केलेल्या नागरिकांनी पुढील १३ दिवस  घराबाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद