शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाच्या सावटामुळे पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 20:57 IST

४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह  पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे.

औरंगाबाद -  कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ४३नुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी केले. ४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह  पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे. यात्रेकडे येणाऱ्या जनसमुदायास प्रतिबंध करण्यात येणार असल्याने दिंड्यांना अर्ध्या रस्त्यातून हात जोडून माघारी फिरावे लागणार आहे.

नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र पैठण येथे येतात. कोरोना  आजाराची लागण होऊन जगभरात १०५,  देशात अंदाजे ३८१७  लोक दगावले आहेत, आतापर्यंत ११००२ पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  भारतात  ४३  जणांना याा आजाराची लागण झाल्याचे ( WHO ) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना 5 मार्च 2020 च्या मार्गदर्शिके मध्ये दिलेल्या आहेत. केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या करोना व्हायरस प्रतिबंध आराखडा दिनांक 03 मार्च 2020 नुसार जिल्हाधिकारी हे प्रतिबंधक मोहीमेचे नोडल अधिकारी आहेत . आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर रहावे म्हणन गर्दी , यात्रा , मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे सदर आराखडया मध्ये निर्देश दिले आहेत. पैठण , जिल्हा औरंगाबाद येथे श्री नाथ षष्ठी महोत्सव निमिताने आयोजित यात्रे मध्ये राज्यातील अनेक भागातून भाविक येतात आणि दिनांक 14  ते 16  मार्च 2020  दरम्यान अंदाजे 3 ते 5 लाख भाविक येतात. आणि कोरोना व्हायरसचा रुग्ण जर यात्रेमध्ये आला तर यामुळे कोरोना व्हायरस आजार ग्रस्तांच्या भर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर आजारावर अदयापपर्यंत कुठलाही प्रतिबंधीत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. 

नाथषष्ठी महोत्सव यात्रेमध्ये व जमणाऱ्या जनसमुदाया मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून या ठिकाणी जात असलेल्या व्यक्तींना / भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्टया अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हयात कोरोना या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवित हानी होऊ नये या दृष्टीने सुरक्षीततेची उपाययोजना म्हणून  जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये पैठण , ता . पैठण , जि . औरंगाबाद येथील एकनाथ - षष्टी निमित आयोजित यात्रेस विशेष उपाययोजना करण्याचे दृष्टीने स्थगिती दिली आहे .

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या