शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Coronavirus: पीपीई किट घालून आईचा बाळासाठी कोरोनाशी लढा, मरणाच्या दाढेतून सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 09:07 IST

Coronavirus: आई-वडील दोघेही निगेटिव्ह आले. पण बाळ कोरोनाबाधित, तेही दुसऱ्यांदा. उपचार कसे करायचे, हा प्रश्न होता. पण आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : आई-वडील दोघेही निगेटिव्ह आले. पण बाळ कोरोनाबाधित, तेही दुसऱ्यांदा. उपचार कसे करायचे, हा प्रश्न होता. पण आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांचे विविध उपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईने दिलेली साथ बाळाला मरणाच्या दाढेतून बाहेर घेऊन आली.नांदेड येथे एक २ वर्षांचे बाळ रुग्णालयात भरती झाले. हे बाळ कोरोनामुक्त झाले होते. मात्र, कोविडनंतरही खूप ताप येणे, कमी रक्तदाब, मेंदूज्वर, आतड्यांवर सूज, लघवी कमी होणे असे सगळे त्रास होत होते.  डॉक्टरांनी  उपचाराचा प्रयत्न केला. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांनी बाळाला औरंगाबादला नेण्याचा सल्ला दिला.  बहुतांश अवयव निकामी झालेल्या अवस्थेत हे २ वर्षांचे बाळ ५ मे रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल पाठक यांनी बाळाला दाखल करून घेतले.  बाळ कोरोनामुक्त आहे, असे सांगितले होते. तरीही उपचारांना सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने ते पॉझिटिव्ह आले. कोरोनामुळे बाळावर नॉर्मल वॉर्डमध्ये उपचार करता येणार नव्हते.  बाळाच्या आई आणि बाबांचीही तपासणी करण्यात आली. दोघेही निगेटिव्ह आले. बाळाजवळ थांबण्याचा प्रश्न होता. मात्र, आईने पीपीई किट घालून बाळासोबत कोविड वॉर्डमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयानेसुद्धा परवानगी दिली.  

अवघ्या ८ दिवसांत बाळ नॉर्मलअवघ्या ८ दिवसांत बाळ नॉर्मलवर आले. डॉक्टरांचे विविध उपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईने दिलेली साथ बाळाला मरणाच्या दाढेतून बाहेर घेऊन आली. आई-बाबा तर सुखावलेच, पण डॉक्टरांच्या संपूर्ण पथकालाही आनंद झाला. १० दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर बाळाला घरी सोडण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद