शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या फटक्याने दुग्ध व्यवसायिक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:57 IST

दुधाच्या भावात झाली मोठी घसरण

ठळक मुद्देदुधाची विक्री केल्यानंतरची देयके मिळणार महिन्यानंतर

कन्नड - कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊन चा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला असून हा व्यवसाय आता संकटात सापडला आहे. पर्यायाने जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

तालुक्यातील चिखलठाण हे सुमारे ६ हजार ५०० लोकवस्तीचं गाव. मुख्य व्यवसाय शेती.एकेकाळी ऊसाचे माहेरघर असलेलं हे गाव. आता मात्र या गावात दुधगंगा वाहते आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये. गावातील सुशिक्षित शेतकरी तरुणांनी तीन वर्षापूर्वी मुक्त गोठा संकल्पना अंमलात आणण्यास सुरुवात केली.आज या गावात सुमारे २० मुक्त गोठे आहेत. प्रत्येक गोठ्यात किमान चार पासुन दहा दुभत्या संकरीत गायी आहेत. कमीत कमी ८ लिटर ते जास्तीत जास्त ४० लिटर दुध देणाऱ्या गायी गोठ्यात आहेत. सुमारे २०० लिटर दुधाचे उत्पादन घेणारे शेतकरी ही या गावात आहेत. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याने साहजिकच दुधसंकलन केंद्रांची संख्या वाढली. पूर्वी या गावात महानंदची एक सहकारी दुध संकलन संस्था होती. त्यानंतर दुसरी महिला सहकारी दुध संकलन संस्था सुरू झाली. मात्र दुधाचा उत्पादन वाढत गेले आणि दुधाला मिळणाऱ्या भावात चढाओढ सुरू झाली. परिणामी गावात सहा खाजगी दुधसंकलन केंद्र सुरू झाले.सर्व दुधसंकलन केंद्रावर मिळून दररोज सकाळी चार ते साडेचार हजार लिटर तर सायंकाळी तीन ते साडेतीन हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते.        पूर्वीची परिस्थिती                                                                साडेतीन फॅटच्या दुधाला ३२ रु.लिटर भाव मिळत होता. दर १० दिवसाला दुधाचे पेमेंट मिळत  होते.यामुळे जोडधंदा म्हणुन सुरु केलेला  दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसायाची जागा घेऊ लागला होता. आगामी दोन वर्षात या गावातुन दररोज सुमारे १५ हजार लिटर दुधाचे उत्पादन होईल असा अंदाज होता व आहे.   सद्य परिस्थिती     दुध संकलन केंद्रावर ७५ टक्केच दुध खरेदी केले जात आहे. तर महानंद च्या केंद्रावर दुध संकलन बंद आहे. दुधाच्या भावात लिटरमागे १२ रुपयांची घसरण असुन २० रुपये लिटरप्रमाणे दुध खरेदी केले जात आहे. दुधाचे पेमेंट ३० दिवसानंतर मिळणार आहे असे सांगण्यात येत आहे.

शेतकरी संकटातसध्या दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर गायीचा सांभाळ करावा लागत आहे.परिणामी या व्यवसायात उतरणारे तरुण या व्यवसायात उतरणार नाहीत अशी प्रतिक्रिया दुधउत्पादक किरण चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादmilkदूधFarmerशेतकरी