शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लॉकडाऊनमध्ये लिकेज; रामनगर कोरोनाबाधित का झाले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:39 IST

संजयनगर भागात अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असताना हा परिसर १०० टक्के लॉकडाऊन केला नव्हता.

ठळक मुद्दे सलग ६ दिवस कडक लॉकडाऊन हवा

औरंगाबाद : रामनगर, मुकुंदवाडी भागात मागील २ दिवसांमध्ये तब्बल ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर एका ८० वर्षीय  व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामनगर कोरोनाबाधित का बनले,  असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रामनगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संजयनगर भागात अगोदरच मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असताना हा परिसर १०० टक्के लॉकडाऊन केला नव्हता. आता रामनगरमध्ये सलग सहा दिवस लॉकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर, म्हाडा कॉलनीत सर्वसामान्य गोरगरीब आणि विविध कंपन्यांतील कामगार मोठ्या संख्येने राहतात. मागील दोन महिन्यांमध्ये हा भाग कोरोनापासून दूर होता. या वसाहतीपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगरात ७० पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र, हा परिसर दर्शनी भागात पुरताच बंद करण्यात आला. पाठीमागील परिसर जशास तसा होता. संजयनगर भागातील अनेक नागरिक वेगवेगळ्या मार्गाने रामनगरमध्ये दाखल होत असत. या भागातील एका किराणा होलसेल दुकानावर  गर्दी होत होती. याकडे प्रशासन आणि नागरिकांनीही फारसे लक्ष दिले नाही. 

रामनगरमध्ये कोरोनाचा प्रवेशरामनगरातील एक ८० वर्षीय वृद्ध छोटीशी दुकान चालवत होते. या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ व इतर चिप्स घेण्यासाठी तरुण गर्दी करीत असत. तरुणांनी गुटखा खाऊन परिसरात पिचकाऱ्या मारल्या होत्या. सदरील वयोवृद्ध नागरिकाला सर्वात अगोदर कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, आसपासच्या तब्बल ४१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आज उघड झाले. यामुळे  भीतीचे वातावरण असल्याचे माजी महापौर बापू घडमोडे यांनी सांगितले. पालिकेने निर्जंतुकीकरण करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

प्रत्येक गल्लीत लॉकडाऊन हवेरामनगर भागातील सर्वच वसाहतींमध्ये अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. या गल्लीतील नागरिक त्या गल्लीत सहजपणे ये-जा करू शकतात. ही प्रक्रिया प्रशासनाला पूर्णपणे थांबवावी लागेल. परिसरात किमान सहा दिवस १०० टक्के लॉकडाऊन करायला हवे. मेडिकल दुकाने आणि दूध या दोन वस्तू वगळता इतर कोणत्याही सामानाचा पुरवठा न केल्यास कोरोना विषाणूंची साखळी ब्रेक करता येईल, असे घडमोडे यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद