शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पैठणमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या वाढली; स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा निर्णय   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:58 IST

गुरूवारी रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा दोन दिवस थांबण्याची वेळ आल्याने या मजुरांचा मोठा हिरमोड झाला आहे.

पैठण : तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची संख्या वाढल्याने या मजुरासाठी येत्या दोन दिवसात स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज दिली. 

गुरूवारी औरंगाबादरेल्वे स्थानकातून सायंकाळी   भोपाळला रवाना झालेल्या रेल्वेद्वारे पैठण तालुक्यातील ५८१ मजुरांना मध्यप्रदेश राज्यात पाठविण्यात येणार होते. परंतु, या रेल्वेत पैठणच्या मजुरांसाठी २०० आसन शिल्लक राहिले होते. त्यातच पैठण तालुक्यातून मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी प्रशासनाकडे १००० पेक्षा जास्त मजुरांनी नोंदणी केल्याने पैठण तालुक्यातील मजुरासाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. येत्या दोन दिवसात स्वतंत्र रेल्वे सोडण्यात येणार असून १२०० मजुर या रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात परत जातील असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.

पैठण तालुक्यात विटभट्टी व जिनिंग साठी मोठ्या प्रमाणावर मध्यप्रदेशातील मजुर येतात. आज रोजी मध्यप्रदेशातील १५२४ पेक्षा जास्त मजुर पैठण शहरात आहेत. काही मजूर तालुक्यात आहेत. लॉकडाऊन परिस्थितीत या मजुरांची प्रशासनाने विविध कँप मध्ये व्यवस्था केलेली आहे. यापैकी १२०० मजुरांनी त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे. 

पैठण तालुक्यातून बऱ्हानपूर ०६, खांडवा ९००, बडवणी २२, बालाघाट, ३४, मंडाला ०७, बीरसा ०५, संटाना ०२, भुनापूर ०२, बैतूल १९ खरगांव या जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त मजुरांनी परत जाण्यासाठी प्रशासनाकडे नोंदणी केलेली आहे. पैठण तालुक्यातील मजुरांची एका रेल्वेची प्रवासी संख्या पूर्ण होत असल्याने स्वतंत्र रेल्वे द्वारे या मजुरांना परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.दरम्यान गुरूवारी रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना पुन्हा दोन दिवस थांबण्याची वेळ आल्याने या मजुरांचा मोठा हिरमोड झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस