शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

CoronaVirus : 'आवक घटली, उधारी फसली'; चहा टपरी बंद असल्याने पत्नीचे उपचार उसनवारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:15 IST

कारखाने बंद: कामगार गावाकडे स्थलांतरीत उधारीची चिंता वाढली

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने सामाजिक अंतराने कारखाने बंद झाली असून, कामगार उपासमारी टाळण्यासाठी गावाकडे तर काही घरीच बसले आहेत. परंतु  चहा, नाश्ता पुरविणाऱ्या चहा टपरी चालकांची मोठी अर्थिक कोंडी झाली आहे. महिनाभराची उधारी फसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आजारी पत्नीच्या उपचारासाठी उसनवारी सुरू असल्याची खंत राजू ढगे पाटील यांनी मांडली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थोपविण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे.परंतु त्यातही जे रोजच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात अशा व्यक्तींना तर मोठ्या गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या चहा पाण्याची व्यवस्था करण्याची संधी गत २० -२२ वर्षापासून सुरू आहे. अख्खे कुटुंब या कामात हातभार लावित आले असून, व्यवसायातून फारसी कमाई होत नाही. चहा वाटण्यापासून ते नाष्ट्याची सोय करताना मोठी कसरत करावी लागते. कंटाळून तीनही मुलांनी कारखान्यात रोजंदारीवर जात आहेत.

संचारबंदीने मुले आणि चहा टपरी चालकही घरीच असून, त्यात ढगे पाटील यांच्या पत्नीला कर्क रोगाने ग्रासले असल्याने त्यांचा उपचार तीन वर्षापासून सुरू आहे. मिळणाºया कमाईतून पत्नीचे उपचारावर खर्च भागविला जात असताना आठवड्यापासून एक कप चहा विकलेला नाही, त्यामुळे कमाईला ब्रेक लागला आहे. कारखान्यात शुकशुकाट झाला असून, चिटपाखरू रस्त्यावर फिरताना दिसत नाही. वर्दळीच्या रस्त्यावर जणूकाही स्मशानशांतता पसरली आहे. असे भयावह चित्र पाहावयास मिळत आहे.

सुट्टीत कामगार गावाकडे...कारखान्यातील कामगार चहा, नाष्टा घेऊन जातात आणि महिन्याकाठी वसूली देतात. परंतु सुट्टीमुळे ते गावाकडे निघून गेले आहेत. १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. ते परत आले की, सोयीचे होईल,पुन्हा संचारबंदी वाढल्यास काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चहा टपरी चालकांकडेही लक्ष हवेजिल्ह्याबाहेरील गावावरून पोट भरण्यासाठी आलेल्या विना भांडवली व्यवसाय करणाºया चहा टपरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांच्यावर आवलंबून कुटुंबाची खान्या पिण्याची तसेच आरोग्याची हेळसांड होत आहे. शासन तथा स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी,अशी मागणी आहे. - राजू ढगे पाटील

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद