शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दारू विक्रेत्याने लढवली नामी शक्कल; जारमधून हातभट्टी दारूची सुरू केली होम डिलिव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 15:17 IST

दोघांना जारमधून दारूची वाहतुल करताना पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देदारूची मिनरल वॉटरच्या जार मधून केली तस्करीदुचाकीवर जार मधून करत असत होम डिलिव्हरी

लासूर स्टेशन: तळीरामांची नशा भागवून नफा कमविण्याच्या उद्देशाने अवैध दारू विक्रेते काय डोकं लावतील याची कल्पना न केलेलीच बरी. लासुर स्टेशन येथे गुरूवार दि.9 रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान अशीच एक नामी शक्कल लढवून चक्क दोन पाण्याच्या जार मधून चाळीस लीटर अवैध हातभट्टीची दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना शिल्लेगाव पोलिसांनी पकडले. समीर छोटू शेख (वय 38), अलीम सलीम सय्यद (वय28) दोघे रा. शक्कर भाई मोहला. लासुर स्टेशन असे आरोपींचे नावे आहेत.       या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पो.काॅ. शुभम पालवे, अनिल दाभाडे, दादाराव तिड़के हे गुरूवार दि.9 रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान लासुरगांव रस्त्यावर  राममंदिरा जवळ गस्त करित होते. त्यावेळी त्यांना एका दुचाकीवरून ( एम एच 20 डी जी 3518) दोघेजण दोन पाण्याचे जार घेऊन जाताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वारांना थांबवले. 

यावेळी दोन्ही जार तपासले असता त्यात हातभट्टीची दारू असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चार हजार रुपये किंमतीची हातभट्टीची दारू असलेले दोन जार व एक मोटरसायकल जप्त करून दोन्ही आरोपी विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रँडेड दारूपेक्षा जास्त भावात विक्रीनोंदणीकृत देशी-विदेशी दारूचे दुकान व बार सील करण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे हीच संधी साधून अनेकांनी हातभट्टीची दारू उपलब्ध करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.  आरोग्याला अत्यंत घातक करू शकेल अशी ही दारू ब्रँडेड दारू पेक्षाही जास्त महाग विक्री होत असल्याची चर्चा आहे हे विशेष

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस