शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : आनंदवार्ता ! भारत बटालियनच्या ६७ जवानांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:31 IST

७ जवानांचे अहवाल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : सातारा येथील भारत बटालियन ( राज्य राखीव बल )च्या ६७ जवानांनी मंगळवारी कोरोना वर मात केली. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव(जिल्हा नाशिक) येथे दिड महिन्याचा बंदोबस्त करून भारत राखीव बटालियनची एक कंपनी ८ मे रोजी औरंगाबाद्ला परतली होती. यातील  तीन अधिकाऱ्यासह ७४ जवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते .   

भारत राखीव बटालियनच्या मालेगाव(जिल्हा नाशिक) येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या एका कंपनीतील काही जवानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यामुळे येथे आलेल्या सर्व जवानांना थेट सातारा येथील राज्य राखीव दलाच्या कॅंपस मध्ये प्रवेश न देता श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ठेवले होते . दुसऱ्या दिवशी सर्व जवानांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत तीन अधिकाऱ्यासह ७४ जवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते . तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते . या उपचाराला ६७ जवानांनी प्रतिसाद देत कोरोनावर मात केल्याचे मंगळवारी सामोर आले.

सोमवारी सर्व जवानांची कोरोना तपासणी करण्यात आली होती यातील ६७  जवानांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. तर ७ जवानांचे अहवाल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी तीन जवानांवर धूत हॉस्पिटलमध्ये तर चार जवानांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती सहायक समादेशक आय . एस .शेख यांनी दिली. डॉ नीता पाडळकर, डॉ . सुहास वाव्हळे, औषधी निर्माता अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे, सुनील सूर्यवंशी, मुकेश कासाट यांनी जवानांवर यशस्वी उपचार केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस