शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता

By सुमेध उघडे | Updated: May 9, 2020 13:59 IST

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

ठळक मुद्दे सम-विषम तारखेचा प्रयोग योग्य असल्याचे मत  विविध यंत्रणांमध्ये समन्वय असल्याचेही व्यक्त केले मत

- सुमेध उघडे  

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीला नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता हे कारण असल्याचे मत औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.  शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या आधी आढळलेल्या भागांसह शहरातील नवनव्या भागातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आॅनलाईन सर्वेक्षण केले. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे कारण काय असावे, या पहिल्या प्रश्नावर तब्बल ५३.८ टक्के उत्तरदात्या नागरिकांनी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीमागे प्रशासनाची शिथिलता आणि नागरिकांची बेफिकिरी असे दोन्ही कारणीभूत असल्याचे मत नोंदविले आहे. तर ३८ टक्के नागरिकांना यामागे प्रशासनाची शिथिलता असून, केवळ  ८.२ टक्के उत्तरदात्यांना नागरिकांची बेफिकिरी यास कारणीभूत असल्याचे वाटते.

दुसऱ्या प्रश्नात, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी समन्वय आहे असे वाटते का, या प्रश्नावर  ४६.२ टक्के नागरिकांनी या सर्व यंत्रणेच्या कामावर समाधान व्यक्त करून समन्वय आहे असे म्हटले आहे. मात्र, ३९.८ टक्के उत्तरदात्यांना यांच्यात समन्वय नाही, असे वाटत असून १४ टक्के नागरिकांनी माहिती नाही असे मत नोंदविले. 

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन काळात सम- विषम तारखांना जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू-बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का, या प्रश्नावर ५७.३ टक्के नागरिकांनी निर्णय योग्य असल्याचा कौल दिला आहे. तर ३८.९ टक्के नागरिकांना हा निर्णय योग्य नसल्याचे वाटत असून, ३.८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले आहे. 

लॉकडाऊन १७ मेनंतर वाढवा रेड झोनमध्ये आलेल्या औरंगाबादचा लॉकडाऊन कालावधी १७ मेनंतरही वाढवायला हवा का? या प्रश्नावर तब्बल ७४.७ टक्के नागरिकांनी सकारात्मकता दर्शवून होय म्हटले आहे, तर केवळ १३.१ टक्के नागरिकांनी लॉकडाऊन कालावधी वाढवू नये, असे वाटत असून १२.३ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार