शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचे तिहेरी शतक; आणखी २४ जण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या @३२१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 08:43 IST

२७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता.

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढतच आहे. शहरात मंगळवारी सकाळी तब्बल २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे.

औरंगाबादेत सोमवारपर्यंत २९७ रुग्णसंख्या होती. सोमवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळून आले होते. २७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळीच २४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात २१ रुग्ण एकट्या जयभीमनगर येथील आहेत. बुद्धनगर, अजबनगर आणि संजयनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली.

असा वाढला आलेखशहरात १५ मार्चला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दिड महिन्यात ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलपासून २९,२७,२१,४९,३९, ४०, २७, १४, २४ अशी दर दिवशी अनुक्रमे वाढ झाली. शहरातील बाधितांची संख्या २७३ वर पोहचली. यातील दहा जणांचे मृत्यू झाले असुन २४ जण कोरोनामुक्त झाले. तर एक रुग्ण पुन्हा बाधित झाला. यात नव्या भागांतही बाधित आढळायला सुरुवात झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

नव्या हॉटस्पॉटची भरमुंबई आणि पुण्यानंतर राज्यात औरंगाबादमध्ये रुग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढत आहे.यात नव्या ठिकानांतून शहर ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरात अवघ्या दोनच दिवसांत ७ नव्या भागांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील तब्बल ३६ भागातील हॉटस्पॉटमधील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुलाबवाडी-पदमपुरा, मेहमूदपुरा, भडकलगेट, सिटी चौक, सिडको एन-५ येथील विजयश्री कॉलनी, बुद्धनगर आणि वाळूज महानगर येथील वडगाव कोल्हाटी, पुंडलिक नगर, हुडको ११ या ठिकाणी कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.पूर्वीच्या हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरासह नव्या भागात वसाहतींमध्ये कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाले. नव्या हॉटस्पॉटची भर पडल्याने. दिवसेंदिवस संपूर्ण शहर कोरोनाच्या जबड्यात जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. 

असे वाढले रुग्ण२७ एप्रिल २९२८ एप्रिल २७२९ एप्रिल २१३० एप्रिल ४७१ मे ३९२ मे ४०३ मे २७४ मे १४५ मे २४--३२१ एकुण कोरोना पॉझीटीव्ह१० मृत्यू२५ कोरोनामुक्त०२ पुन्हा बाधित

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद