शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून 'ब्रेक' लागलेले ‘कोरोन टास्क फोर्स’ पुन्हा मैदानात; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 17:25 IST

coronavirus in Aurangabad : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली.

ठळक मुद्देकोरोनाबाबत निष्काळजीपणा, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळल्यास दंडात्मक कारवाई

औरंगाबाद : रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाच महिन्यांपासून ‘ब्रेक’ लागलेल्या ‘कोरोना टास्क फोर्स’ची बैठक घेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्वांना कामाला लावले आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, भाजी मंडई, मॉल, आठवडी बाजार, बसस्टँड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी विशेष लक्ष द्या. सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक करा. विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले. सर्व यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेऊन कोरोनाबाबत स्थापन केलेल्या सर्व समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचेही त्यांनी सुचविले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. सुंदर कुलकर्णी, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मणीयार, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ.सुधाकर शेळके, आदींसह खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.

महापालिकेने काय करावे?महापालिकेने विना मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. कोविड केअर सेंटर, औषधांचा नियमित आढावा घ्यावा. बसस्टँड, रेल्वे स्टेशन येथे तपासणी केंद्र सुरूच ठेवावेत, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, कोविड लसीकरण मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हा परिषदेने काय करावे?जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात गांभीर्याने लक्ष द्यावे, ग्रामीण रुग्णालये सुसज्ज ठेवावेत तसेच मास्क वापरणे बंधनकारक करावे.

जिल्हा प्रशासनाने हा प्रयत्न करावाउपविभागीय अधिकारी, तहसीलदार पोलिसांनी नियमित बैठका घेऊन समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा. औद्योगिक क्षेत्रात कोरोना नियंत्रणाची नियमावली बंधनकारक करावी. जिल्हा प्रशासनाने नियमितपण टास्क फोर्सच्या बैठका घ्याव्यात.

एस. टी. महामंडळाला सूचना अशाएस.टी. बसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवू नये. मास्कशिवाय बसमध्ये कोणालाच प्रवेश देऊ नये, विनामास्क आढळल्यास किंवा विरोध केल्यास गुन्हा दाखल करावा तसेच बसस्थानकाच्या परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करावी. लाऊडस्पीकरद्वारे वेळोवेळी सूचना कराव्यात.

आरटीओवरही जबाबदारीऑटो रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणाऱ्यांवर आरटीओंनी कारवाई करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली आहे.

घाटी व आरोग्य विभागासाठी या सूचनाघाटीने बेड सज्ज ठेवावेत. औषधी, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खासगी रुग्णालयांनी कोविड व नॉन कोविड असे भाग करुन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड ठेवावेत तसेच ऑक्सिजन निर्मिती युनिट बसवावे. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांनी तत्काळ लस घ्यावी तसेच फ्रंटलाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनीही लस घ्यावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद