शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : खबरदारी ! पैठणच्या शशी विहार वसाहतीतील ११० रहिवाशी होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:31 IST

जंतूनाशक व रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून परिसर सील करण्यात आला आहे.

ठळक मुद्देघाटी रुग्णालयातील ब्रदरला कोरोनाची लागणब्रदरचे शशी विहार वसाहतीमध्ये नातेवाईक

पैठण : पैठण शहरातील शशी विहार वसाहती मधील जवळपास ११० रहिवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून जंतूनाशक व रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून परिसर सील करण्यात आला आहे.

घाटी रूग्णालय औरंगाबाद येथील कोरोनाची लागण झालेला ब्रदर शशी विहार परिसरातील नातेवाईकांकडे येऊन गेल्याची माहीती समोर आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून आज ही कार्यवाही केली. दरम्यान, कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या  वसाहतीतील सहा नागरिकांचे  कोरोना टेस्टसाठी स्वँब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.औरंगाबाद शासकीय रूग्णालय ( घाटी) येथे काम करत असलेल्या एका ब्रदरला कोरोनाची लागन झाल्याचे रविवारी समोर आले होते. दरम्यान हा ब्रदर पाटेगाव ता पैठण येथील मुळ रहिवाशी असून त्याची सासरवाडी पैठण शहरातील शशी विहार भागात असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा रविवार पासून सतर्क झाल्या आहेत. सोमवारी रात्री या ब्रदरचे नातेवाईक असलेल्या सहा जणांना कोरोनाची तपासणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हलवले . बुधवार पर्यंत या सहा जणांच्या कोरोना टेस्टचा अहवाल  अपेक्षित आहे. अहवाल काय येतो या शंकेने परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी शासकीय रूग्णालयातील डॉ संदिप रगडे, तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, आरोग्य पथकातील कर्मचारी, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व त्यांचे पथक आदिंनी  शशी विहार वसाहतीतील नागरिकांना कोरोना संदर्भात माहिती देऊन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. पुढील १५ दिवस या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. 

नगर परिषदेच्या वतीने  आज शशीविहार भागात मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, प्रभारी नगराध्यक्ष सुचित्रा महेश जोशी , स्वच्छता सभापती भूषण कावसानकर, नगरसेवक ईश्वर दगडे, स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, व्यंकटी पापूलवार, आदीच्या पथकाने अग्निशमन गाडीच्या फवाऱ्या द्वारे जंतूनाशक फवारणी करून परिसर निर्जंतुक केला. दरम्यान, शशी विहार परिसर आज सकाळी पोलिसांनी सील केला असून या भागात कायम स्वरूपी गस्त तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले. तहसील प्रशासनानेही या भागात एक बैठे पथक नियुक्त केले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर हे पथक लक्ष ठेवून प्रशासनास माहिती देणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. दरम्यान,परिसरातून चाचणीसाठी नेलेल्या सहा रहिवाशांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह यावा म्हणून या भागातील नागरिकासह पैठणकर  देव पाण्यात ठेवून बसले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद