शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परप्रातीय मजूरांसाठी बाळापूर गाव सरसावले; ग्रामस्थांकडून रोज १०० जणांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:44 IST

१४ तारखेपर्यंत अन्न पुरविण्याचा संकल्प

ठळक मुद्देसर्व ग्रामस्थ करतात जेवण जमा

-सुनील गिऱ्हेऔरंगाबाद : भालगाव फाट्यावरील महाविद्यालयात आश्रयाला आलेल्या १०२ मजूरांना बाळापूर येथील ग्रामस्थ रोज सकाळी जेवण पूरवित आहेत. लॉकडाऊन असेपर्यंत मजूरांना अन्न पुरविण्याचा संकल्प गावक-यांनी केली आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर काही मजूर पायीच आपल्या गावी निघाले होते तर काहींना निवारा नसल्याने पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागातल्या परप्रांतीय १०२ मजूरांची भालगाव फाटा परिसरातील शिवा ट्रस्टच्या यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालयात निवासाची व्यवस्था केली. या मजूरांमध्ये पाच महिला, १२ लहान मुले आणि ८५ पुरूषांचा समावेश आहे. २८  मार्च रोजी रात्री आलेल्या मजुरांची सुरूवातीला शिवा ट्रस्टच्या वतीने डॉ. बाळासाहेब पवार यांनी जेवनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर किचनचंद तणवानी, पोलीस उपायुक्त राहुल खाडे, एस.पी जवळकर यांनी यांच्यासह काही सामाजिक संस्थांनी जेवनाची व्यवस्था केली.  ३१ मार्च रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. महेश आंधळे यांनी बाळापूर येथील ग्रामस्थांना मजूरांच्या जेवनाची व्यवस्था करण्यासंदर्भात विचारणा केली. त्यास गावक-यांनी होकर देत रोज १०२ नागरिकांना जेवन पुरविण्याचा शब्द दिला.

 मजुरांना सकाळी बाळापूर ग्रामस्थांच्यावतीने जेवन देण्यात येत आहे. यासाठी गावात दवंडी देऊन या मजूरांना १४ तारखेपर्यंत जेवन पुरविण्याबात माहिती देण्यात आली. त्यामुळे रोज सकाळी येथील मारूती मंदिरासमोर नागरिक ज्वारी, बाजारी, तसेच गव्हा पोळ्या जमा करतात. तसेच एका पाण्याच्या टाकीत भाजी एकत्र करण्यात येते. त्यासोबत लोणचे, मिरचीचा ठेचा त्याचबरोबर शेंदाण्याची चटणी देण्यात येत असून रोज पोटभर जेवन मिळत असल्याने या मजूरांनी बाळापूर ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. रोज हे जेवन पोहोच करण्याची व्यवस्था गांधेली येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर धनाजी तळेकर हे करीत असून आता पाचोडचे माजी उपसरपंच बाबासाहेब घोडके तसेच निपाणी येथूनही मजूरांना सायंकाळी जेवन देण्यात येत असून इतर गावांचाही सहभाग वाढत आहे. मजूरांना जेवन देण्याची इच्छा असेल त्यांनी चिकलठाणा पोलीस ठाणे, शिवा ट्रस्टतलाठी, किंवा तहसीलदारांशी संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे. 

तहसीलदार, तलाठी, पोलीस ठाण मांडून -ज्या ठिकाणी या मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे तिथे तहसीलदार के. कानगुले तलाठी योगेश पंडीत हे रोज पाहणी करून आढावा घेत असून या ठिकाणी चिकलठाणा ठाण्याचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रोज येथे भेट देणाºया अधिकारी, कर्मचाºयांची तसेच सामाजिक संस्थांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून तपासणी -येथील मजूरांची पिंप्रीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वेळोवेळी तपासणी करण्यात येत असून यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशांत दाते, डॉ. रुबिना शेख या पुढाकार घेत आहे. त्यांना शिवा ट्रस्टचे अनिल झाल्टे, रमेश राठोड, डॉ. संदीप कांबळे आदींचे सहकार्य लाभत आहे. मजूरांना मदतीचा ओघ सुरूच - येथे शंभरहुन अधिक मजूर असल्याची माहिती मिळताच सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालय, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांच्याकडून सदर मजूरांना कोलगेट, टुथब्रश, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, तेल तसेच टावेल देण्यात येत असून येथे सर्वोत्तम व्यवस्था होत असल्याने मजूरांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रशासनानेही पाठविला प्रस्ताव -भालगाव येथील महाविद्यालयात थांबलेल्या १०२ मजूरांच्या जेवनाची व्यवस्था शासनाकडून व्हावी, यासाठी जिल्हाधिकाºयांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर आणखी एक दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शासनाचे जेवन येईल तेव्हा येईल. मात्र, आम्ही या मजूरांना लॉकडाऊन संपेपर्यंत जेवन पुरवित राहू असा संकल्प ग्रामस्थांच्या वतीने बाळापूर येथील तंटा मुक्त समिती अध्यक्ष सुभाष पवार, सोयायटी चेअरमन रामराव खाडे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाघ, गणेश वाघ, विठ्ठल वाघ, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य यांनी केला आहे. 

काय असते जेेेवण- बाळापूर येथील ग्रामस्थांकडून दिलेल्या जाणाºया जेवनात एक पाण्याची टाकी भरून भाजी, दोन कॅरेट ज्वारी, बाजरी तसेच पोळ्या. त्याबरोबर मिरचीचा ठेचा, शेंगदाना चटणी तसेच खारूडी, खांब्याचे घरगुती लोनचे आदीचा समावेश असतो. गावकरी कुणी दोन भाकरी देत तर कुणी चार ते पाच भाकरी आणि दोन डबे भाजी देऊ करीत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद