शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Aurangabad : 'हमका पीनी है, पीनी है'; दारू दुकाने,बारला सील ठोकल्याने तळीरामांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 12:06 IST

दारू दुकाने आणि बार बंद असूनही दारू मिळत होती

ठळक मुद्देप्रशासनाने कडक पाऊले उचलत दुकाने आणि बार सील केलेतळीरामांच्या जीवाची घालमेल होतेय

- संजय जाधव

पैठण : 'हमका पीनी है, पीनी है' म्हणत दिवसभरसंचारबंदीत दारूच्या सर्चिंगमध्ये फिरत असलेल्या तळिरामांची तजवीज कुठे ना कुठे होत होती, यामुळे गेल्या दहा बारा दिवसात तळिरामांची ओरड वा संताप कुठे दिसून आला नाही. परंतु, आजपासून दारू उत्पादन शुल्क विभागाने शहरातील व तालुक्यातील सर्व देशी दारू, परमीट रूमला सील ठोकून गुपचूप दारू मिळण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. यामुळे तळिरामात अस्वस्थता पसरली आहे.  यापुढील दिवस मात्र तळिरामांची कसोटी पाहणारे ठरणार आहे, यात शंका नाही.

आज जिल्हाभरातील सर्व देशी दारू व परमिट रूमला सील ठोकण्यात आले. सील तोडल्यास संबंधिताचा परवाना रद्द करण्याचा ईशारा दारूबंदी निरीक्षक शरद फटांगडे यांनी दिला आहे. पैठण शहरातील १६ परमिट रूम व सहा देशीदारू दुकानांना आज सील ठोकण्यात आले.  उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचाऱ्याकडून आज दिवसभर ही कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून देशीदारू व परमीट रूम बंद.होते. मात्र, तळिरामांना दारूचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या यामुळे या दुकानास सील लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे  निरीक्षक शरद फटांगडे यांनी सांगितले. दरम्यान पैठण तालुक्यात दारूची दुकाने बंद असताना तळिरामांना मद्य उपलब्ध होत होते, या बाबत तळिरामाची तक्रारही नव्हती. एका जणाने तर मद्याची घरपोच सेवा सुरू केली होती.

पैठण शहरातून तालुक्यातील ग्रामीण भागात भल्या पहाटे दारूचा पुरवठा होत होता. संचारबंदीतही सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. पण अचानक उत्पादन शुल्क विभागाने आज दुकानांना सील ठोकल्याने तळिरामाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दारू नसेल तर मी जगू देणार नाहीदारूसाठी तळिराम काय करतील याचा नेम नाही, पैठण येथील एका तळिरामाने चक्क दारूसाठी शहरातील  डॉक्टरकडे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. दारू पिली नाहीतर मी जगू शकणार नाही असे प्रमाणपत्र तो डॉक्टर कडे मागत होता. तळिरामाची मागणी ऐकून डॉक्टरांनी डोक्यावर हात मारून घेतला. तळिरामाने पुढे आग्रह रेटल्यावर डॉक्टरने दारू सोडण्याचे इंजेक्शन देऊ का असे विचारताच तळीरामाने दोन्ही हात झटकून दवाखान्यातून काढता पाय घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादalcohol prohibition actदारुबंदी कायदा